खानदेशातील बाजार समित्या सुरळीत
खानदेशातील बाजार समित्या सुरळीत

खानदेशातील बाजार समित्या सुरळीत सुरु

जळगाव व इतर बाजार समित्यांचे कामकाज मंगळवारी (ता. २७) काही वेळ बंद होते. बुधवारी मात्र कामकाज सुरू होते. पुढील भूमिकेबाबत संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी निर्णय घेतील. - दीपक महाजन, कार्याध्यक्ष, जळगाव मार्केट यार्ड अडत असोसिएशन

जळगाव : पणन सुधारणांविरोधातील बंदमध्ये खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबारमधील व्यापारी व माथाडींनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे बाजार समित्यांचे कामकाज बुधवारी (ता.२८) सुरळीत होते. भाजीपाला मार्केट यार्डमध्ये सर्वच ठिकाणी नियमित लिलाव आटोपले.

जळगाव, चोपडा, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, धुळे व दोंडाईचा व नंदुरबारमधील शहादा व नंदुरबार बाजार समित्यांमध्ये भाजीबाजारातील लिलाव सुरळीत पार पडले. फक्त मंगळवारी (ता. २७) जळगाव व चोपडा येथील बाजार समितीमधील धान्य मार्केट यार्डात काही वेळ कामकाज बंद होते. बुधवारी सकाळी ते सुरू झाले. जळगाव बाजार समितीत सकाळी सहापासून लिलाव सुरू झाले. भाजीबाजारात सकाळी १०.२० पर्यंत लिलावाचे कामकाज झाले.  

जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर व धुळे येथील काही व्यापारी व माथाडी यांनी मात्र पणन सुधारणांना विरोध केला. बाजारात सध्या धान्याची अत्यल्प आवक आहे. सोयाबीन, कडधान्य व तृणधान्याची कुठलीही आवक शेतकऱ्यांकडून होत नसल्याची स्थिती आहे. पुढे व्यापारी व माथाडी यांनी बंद पुकारल्यास त्याचा परिणाम अडतदारांना सहन करावा लागेल. शेतकऱ्यांना अडचण नाही. भाजीबाजारातील कामकाज मात्र सुरळीत सुरू ठेवण्याचे नियोजन बाजार समित्यांच्या प्रशासनाने केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

दोंडाईचा, शहादा, नंदुरबार, चोपडा, जामनेर, पाचोरा व अमळनेर बाजार समितीत धान्याची किरकोळ आवक झाली. त्यांचे लिलाव पूर्ण करण्यात आले. जळगाव, रावेर, भुसावळ, यावल बाजारात मात्र धान्याची फारशी आवक नव्हती, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com