agriculture news in marathi In Khandesh, only 25 percent damage was caused by the storm | Page 3 ||| Agrowon

खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के नुकसानीचेच आकडे तयार

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे महिन्याच्या अखेरीस धुमाकूळ घातला. त्यात केळी, भाजीपाला पिके, गोठे, पॉलिहाऊस, शेडनेट व इतर कृषीसंबंधी बाबींची हानी झाली. पण २० ते २५ टक्केच नुकसान झाल्याचे आकडे प्रशासनाने तयार केले आहेत. 

जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे महिन्याच्या अखेरीस धुमाकूळ घातला. त्यात केळी, भाजीपाला पिके, गोठे, पॉलिहाऊस, शेडनेट व इतर कृषीसंबंधी बाबींची हानी झाली. पण २० ते २५ टक्केच नुकसान झाल्याचे आकडे प्रशासनाने तयार केले आहेत. 

कमी म्हणजेच ३० टक्क्यांखाली नुकसान झाल्याचे सांगून संबंधित शेतकरी, कृषी उद्योजकांना भरपाई मिळत नसल्याची स्थिती आहे. धुळ्यातील साक्री, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, जळगावमधील जळगाव, भुसावळ, जामनेर भागात पॉलिहाऊस, शेडनेटचे नुकसान झाले आहे. तसेच रावेर, नंदुरबारमधील शहादा भागात केळीची पडझड वादळी पावसात झाली. केळीसंबंधी विमाधारक शेतकरी जाचक निकषांमुळे वादळासंबंधीच्या भरपाईसह उष्ण वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीस पात्र ठरणार नाहीत, अशी स्थिती आहे. यामुळे प्रशासनाकडून भरपाई मिळणे अपेक्षित आहे. 

पॉलिहाऊस, शेडनेटचे नुकसान, टक्केवारी कशी ग्राह्य धरावी, याच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिलेल्या नाहीत. अनेक भागात केळीचे २० ते २५ टक्के नुकसान झाल्याने संबंधितांना भरपाई मिळणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा सावळा गोंधळ प्रशासन गेली अनेक वर्षे घालत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

रावेरात केळी, भाजीपाला पिकांचे सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर, चोपड्यात सुमारे दीड हजार हेक्टरमध्ये आणि धुळ्यात १२०० हेक्टरवर नुकसान झाले आहे. पण २० ते २५ टक्के नुकसान, त्याचे आकडे भरपाईच्या अहवालात समाविष्ट केल्यास ही नुकसानीची आकडेवारी १५ हजार हेक्टरवर केळीसंबंधी जाईल, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....