Agriculture news in marathi In Khandesh, pressure on onion prices increased | Agrowon

खानदेशात कांदा दरांवरील दबाव वाढला

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

कांद्याचे दर कमी झाल्याने ते परवडेनासे झाले आहेत. किमान १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सरकारने द्यावा. नाफेडने सरसकट (प्रतवारी न करता) कांद्याची शेतकऱ्यांकडून तातडीने खरेदी करावी. 
- कडूअप्पा पाटील, माजी अध्यक्ष, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, जळगाव 
 

जळगाव : खानदेशात कांदा दरांवरील दबाव वाढत असून, दर चार ते सहा रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहेत. कांद्याची नाफेडतर्फे खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे. 

खानदेशात यंदा सुमारे २० हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे १४ हजार हेक्‍टर एवढी लागवड होती. कांदा काढणी सुरू असून, धुळे, पिंपळनेर (ता.साक्री), साक्री, जळगाव, किनगाव (ता.यावल), अडावद (ता.चोपडा), चाळीसगाव या बाजारांमध्ये आवक वाढली आहे. दर्जेदार कांद्याचे उत्पादन यंदा हाती आले आहे. परंतु, दरात मोठा चढउतार सुरू आहे.

एप्रिलच्या सुरवातीला बाजारातील दर ११ ते १२ रुपये प्रतिकिलो, असे होते. परंतु मागील १० ते १२ दिवसांत दरात घसरण सुरू झाली. बाजार समितीत सध्या चार ते सहा रुपये प्रतिकिलोचा दर कांद्यास मिळत आहे. खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे. 

दोन एकरांत ३५ ते ४० हजार रुपये खर्च कांदा उत्पादकांना लागला आहे. यानुसार किमान १२ ते १३ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना थेट जागेवर मिळणे अपेक्षित आहे. सध्या कोरोनाचे संकट व इतर कारणांमुळे बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत नाही. पणन साखळी आक्रसली आहे. परराज्यातही कांदा काढणी सुरू आहे.

सरकारने निर्यात, निर्यात शुल्क याबाबत सकारात्मक निर्णय घेतले नाहीत. निर्यातीला प्रोत्साहन नाही. यामुळे नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू व्हायला हवी. सध्या खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मिळून रोज सहा ते साडेसहा हजार क्विंटल कांद्याची आवक सुरू आहे. ही आवक पुढे आणखी वाढेल, अशी माहिती मिळाली. 

 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...