agriculture news in marathi khandesh pulses industry in crises; losses 30 crore in lockdown period | Agrowon

डाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटका

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ उद्योग पुरता अडकला आहे. निर्यात, प्रक्रिया ठप्प आहे. या ३८ दिवसात उद्योगाला सुमारे ३० कोटींचा फटका बसला आहे.

जळगाव : कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ उद्योग पुरता अडकला आहे. निर्यात, प्रक्रिया ठप्प आहे. या ३८ दिवसात उद्योगाला सुमारे ३० कोटींचा फटका बसला आहे. मालवाहतूक नाही, मजूर नाही, कामगार नाही आणि कच्चा मालही नाही अशा कोंडीत डाळ उद्योग कोंडीत सापडला आहे. 

डाळ निर्यातीत जिल्हा आघाडीवर आहे. काही वर्षांपूर्वी या जळगाव जिल्ह्यात हा उद्योग समृद्ध होता. जवळपास दोनशे प्रक्रिया उद्योग होते, ते औद्योगिक पीछेहाटीमुळे ८० ते ९० वर आले. यातच कोरोनाचे संकट व लॉकडाउनमुळे डाळ उद्योगाची चाके थांबली आहेत. निर्यातही थांबली. जवळपास पाच आठवडे निर्यात बंद असल्याने २५ ते ३० कोटींचा फटका या उद्योगांना बसला आहे. डाळींचा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश होत असला, तरी वाहतूक व्यवस्था व कामगार उपलब्ध नसल्याने हा उद्योग ठप्प आहे. आता काही अंशी निर्यात सुरू झाली असली, तरी वाहतूक व मजुरांची अडचण कायम आहेच. शिवाय, कच्च्या मालाची उपलब्धताही नाही. कारण, वाहतूकच बंद असल्याने कच्चा माल नाही, त्यामुळे प्रक्रिया कशी करणार? या अडचणी दूर केल्यास डाळ उद्योगाची थांबलेली चाके पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकतील. 

प्रतिक्रिया...

डाळ उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल जहाजाद्वारे मुंबईहून येतो. पण, मालवाहतूक पूर्णपणे सुरू न झाल्याने कच्च्या मालाची अडचण आहे. निर्यात मागील चार-पाच आठवडे बंद होती. जवळपास वीस कोटींच्या डाळींची निर्यात आपण करू शकलो नाही. आता काही प्रमाणात निर्यात सुरू झाली आहे. कुरिअर सेवा, जहाजाद्वारे निर्यात काही अंशी सुरू झाली. आगामी काळात ती वाढविली जावी. डाळ उद्योगात काम करणारे अनेक कामगार होळीच्या सणाला आपापल्या गावी निघून जातात. नंतर परत येऊन ते काम करतात. मात्र, होळीनंतर लॉकडाउन झाल्याने कामगार परत आले नाही. 
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव जिल्हा दाल मिल ओनर्स असोसिएशन

डाळ उद्योगात कामगार, मजुरांची कमतरता आहे. जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये डाळींचा समावेश होत असला तरी मालवाहतूक नाही, मजूर नाही, कामगार नाही आणि कच्चा मालही नाही. मग अशा स्थितीत कुठल्या मालावर प्रक्रिया करणार, कुणाकडून करणार? जळगावकडून माल मुंबईला पाठविला, तर तिकडून मालवाहतूक गाड्यांना परतीची ट्रीप मिळत नाही. मालवाहतूक पूर्ववत सुरू झाली, तर डाळ मिल पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करू शकतील. 
- गोविंद मणियार, सदस्य, जळगाव जिल्हा दाल मिल ओनर्स असोसिएशन


इतर अॅग्रोमनी
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...
‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर...नाशिक : भारतीय शेतीमाल व खाद्यपदार्थांना जगभर...
ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन...सध्या शेतकरी कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर करार...
जळगावच्या सुवर्ण बाजाराला झळाळीजळगाव ः शुद्धता, सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
सोयाबीनची चाल पाच हजारांकडे  पुणे ः देशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड...
बेदाणा दरात सुधारणासांगली ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून...
नाईक सूतगिरणीचा कंटेनर निघाला चीन,...पुसद, जि. यवतमाळ : लॉकडाउन काळात पिंपळगाव कान्हा...
बांगलादेशच्या वस्त्रोद्योगात चीनची मोठी...जळगाव ः भारतीय कापसाचा सर्वांत मोठा खरेदीदार...
साखर निर्यात यंदा ठरणार फायदेशीरकोल्हापूर : साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या...
सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटलीसांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...
जागतिक कापूस उत्पादन घटणार; ...जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-...