खानदेशात पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंतच

जळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधील जलसाठा मिळून ४३ टक्के एवढा आहे. हतनूर, अनेर प्रकल्पातील साठा ४० टक्क्यांखाली आला आहे.
In Khandesh, water storage is only up to 43%
In Khandesh, water storage is only up to 43%

जळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधील जलसाठा मिळून ४३ टक्के एवढा आहे. हतनूर, अनेर प्रकल्पातील साठा ४० टक्क्यांखाली आला आहे.

जलसाठा कमी होत असतानाच गिरणा व तापी नदीत पिण्याच्या पाण्यासंबंधीची टंचाई तयार होऊ नये, यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे.  गिरणा नदीवरील नांदगाव (जि. नाशिक) येथील गिरणा धरणातील साठा ४२ टक्के एवढा आहे. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी एवढी आहे. या धरणातून रब्बीसाठी तीनदा पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. तर, हतनूर (ता. भुसावळ) या तापी नदीवरील धरणातूनही रब्बीसाठी तीनदा आवर्तन सोडण्यात आले आहे.

हतनूरमधील साठा सुमारे ३३ टक्के एवढा आहे. या धरणातून दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, भुसावळ पालिका, जळगाव येथील औद्योगिक वसाहतीसाठीदेखील पाणी सोडण्यात आले आहे. तापी नदीकाठी जळगाव, यावल तालुक्यात टंचाई तयार होऊ शकते. यामुळे तापी नदीत हतनूरमधून पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे.

गिरणा नदीतही कानळदा (ता.जळगाव) पर्यंत टंचाई दूर करण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. वाघूर (ता.जामनेर) प्रकल्पातही जलसाठा ४३ टक्के एवढा आहे. वाघूरमधून विविध उद्योग, जामनेर व जळगाव पालिकेसाठी पाणी सोडण्यात आले होते. तसेच रब्बीसाठीदेखील तीनदा आवर्तन सुटले होते. या प्रकल्पाची साठवण क्षमता सुमारे आठ टीएमसी एवढी आहे. 

रावेरातील अभोरा, मंगरूळ, सुकी या मध्यम प्रकल्पांमधील साठाही ४६ टक्के एवढा आहे. पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती प्रकल्पातील साठाही ४५ टक्के एवढाच आहे. तर चाळीसगावमधील मन्याड, एरंडोलातील अंजनी प्रकल्पातील साठाही ५० टक्के आहे. 

पाणीसाठा ३० टक्क्यांपर्यंत येणार

धुळ्यातील अनेर, मालनगाव, अमरावती, पांझरा या मध्यम प्रकल्पांमधील साठाही ४५ टक्के एवढाच आहे. उष्णता व पाण्याची मागणी, यामुळे जलसाठा गेल्या दीड महिन्यात झपाट्याने घटला आहे. खानदेशात अपवाद वगळता सर्व प्रकल्प १०० टक्के भरले होते. त्यात गिरणा, हतनूर, धुळ्यातील पांझरा, अनेर हे प्रकल्प शेतीच्या सिंचनासाठी महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पांमधील साठा पावसाळ्यापूर्वी ३० टक्क्यांपर्यंत येईल, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com