मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीप

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख १६ हजार ९६७ हेक्टर होते. त्या तुलनेत ४७ लाख ८५ हजार ३४३ हेक्‍टरवर खरिपाची पिके आहेत.
Kharif on about 47 lakh hectares in Marathwada
Kharif on about 47 lakh hectares in Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख १६ हजार ९६७ हेक्टर होते. त्या तुलनेत ४७ लाख ८५ हजार ३४३ हेक्‍टरवर खरिपाची पिके आहेत. 

पेरणी झालेल्या खरीप पिकांमध्ये तृणधान्यांमध्ये ७७ हजार १२९ हेक्टर १ लाख ९ हजार ३०९ हेक्‍टर, तर मक्याची २ लाख ३६ हजार ३०५ हेक्टरवर पेरणी झाली. कडधान्यांमध्ये तुरीची ४ लाख ६० हजार ३८८ हेक्टर, मूग १ लाख ४७ हजार ७३२ हेक्‍टर, उडीद १ लाख ४७ हजार ११५ हेक्‍टर, तर इतर कडधान्यांची ४५ हजार २९८ हेक्‍टरवर पेरणी झाली. गळीतधान्यांमध्ये सोयाबिन सर्वाधिक २० लाख ७० हजार ९९३ हेक्टरवर, तर त्यापाठोपाठ कपाशीचे १४ लाख ६२ हजार ४७९ हेक्‍टरवर पीक आहे. 

जिल्हानिहाय पेरणी क्षेत्रात लातूर जिल्ह्यात ६ लाख ३ हजार ३२८ हेक्टर, उस्मानाबाद ५ लाख ३८ हजार ३०१ हेक्टर, नांदेड ७ लाख ५५ हजार २४४ हेक्टर, परभणी ४ लाख ८२ हजार ९०६ हेक्टर, औरंगाबाद ६ लाख ६० हजार ६४६ हेक्टर, तर बीड जिल्ह्यात पेरणी झालेल्या ७ लाख ५४ हजार ८६० हेक्‍टरवरील खरीप पिकांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

उत्पादन खर्चात वाढ

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास खरिपाची पेरणी झाली. पाऊसही कुठे अपेक्षेच्या पुढे जाऊन, तर कुठे समाधानकारक झाला. पोषक वातावर नसल्याने पीक संकटात सापडले. कपाशीची वाढ होत असली तरी अपेक्षेच्या तुलनेत पाते व बोंडं लागत नसल्याची स्थिती आहे. मका, सोयाबीन, भाजीपाल्यातील टोमॅटो इतर पिकेही कीड रोगांना बळी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com