अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१ नियोजनाबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच कृषी विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा नियोजन, मागणी अपेक्षित उपलब्धता व संभाव्य अडचणी या बाबत चर्चा केली.
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित Kharif in Amravati 7 lakh hectare area proposed
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित Kharif in Amravati 7 lakh hectare area proposed

अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१ नियोजनाबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच कृषी विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा नियोजन, मागणी अपेक्षित उपलब्धता व संभाव्य अडचणी या बाबत यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

अमरावती जिल्ह्यांचे खरिपाखाली प्रस्तावित क्षेत्र ७ लाख २८ हजार ११२ लक्ष हेक्टर असून, सोयाबीन, कापूस, तूर ही प्रमुख पिके असून सोयाबीन २ लाख ७० हजार हेक्टर, कापूस २ लाख ६१ हजार हेक्टर व तूर १ लाख ३० हजार हेक्टर आणि मूग, उडीद, ज्वारी व इतर पिकांचे ६७ हजार ११२ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे.

मागील हंगामात माहे सप्टें २०२०पासून सोयाबीन या पिकाचे स्वत:चे बियाणे स्वत: जतन करण्याबाबत जिल्ह्यात विस्तार यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली असून, त्यामध्ये शेतकऱ्यांनी ९२६२० क्विंटल सोयाबीन बियाणे जतन करून ठेवलेले आहे.एकूण २.७० लक्ष हेक्टरससाठी ७५ किलो प्रति हेक्टरप्रमाणे २ लाख १५००० क्विंटल बियाणे पेरणीसाठी लागणार असून, बियाणे बदलाचे प्रचलित प्रमाणानुसार १ लाख ३० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. 

घरातील सोयाबीन वापरा सोयाबीनवर बियाणे, खते, कीटकनाशके व इतर निविष्ठांचा होणारा खर्च विचारात घेता सोयाबीन ऐवजी मूग, उडीद, चवळी, ज्वारी, तीळ या कमी खर्चाच्या पर्यायी पिकांचा अवलंब करणे सुद्धा फायदेशीर ठरू शकते. त्यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढील हंगामात स्वत:कडील सोयाबीन उगवणक्षमता तपासून पेरणीसाठी वापरणे, बियाणे बचतीसाठी पट्टापेर पद्धत ४ ओळीनंतर रिकामी सरी सोडणे, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने पेरणी, आंतरपिकाचे प्रमाण वाढविणे इत्यादी बाबींचा अवलंब करून सोयाबीन बियाणेत बचत करून तसेच सोयाबीनऐवजी मुग, उडीद, बरबटी, ज्वारी, तीळ या कमी खर्चाच्या पर्यायी पिकांची पेरणी करून आपल्या खर्चात बचत करून शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी नियोजन करावे.

सोयाबीन व इतर पीक पेरणीपूर्वी बियाणेला रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशक व जिवाणू संघाची प्रक्रिया करूनच पेरणी करावी. १०० मी.मी. पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. सोयाबीन पेरणी ३-४ से.मी. पेक्षा जास्त खोलीवर केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सोयाबीन, मुग, उडीद, तूर या शेंगवर्गिय पिकांमध्ये युरियाचा वापर अत्यंत मर्यादित करावा तसेच इतर पिकांमध्ये सुद्धा फुलोरा येण्याच्या कालावधीनंतर युरियाचा वापर पूर्णतः: टाळावा.

महागड्या कीटकनाशकांवर खर्च करण्यापेक्षा लिंबोळ्या गोळा करून त्याचा कीड संरक्षणासाठी वापर करावा. शेतीमध्ये होणाऱ्या अनावश्यक खर्चात‍ कपात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com