Agriculture news in marathi Kharif in Amravati 7 lakh hectare area proposed | Agrowon

अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 एप्रिल 2021

कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१ नियोजनाबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच कृषी विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा नियोजन, मागणी अपेक्षित उपलब्धता व संभाव्य अडचणी या बाबत चर्चा केली.

अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१ नियोजनाबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच कृषी विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा नियोजन, मागणी अपेक्षित उपलब्धता व संभाव्य अडचणी या बाबत यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

अमरावती जिल्ह्यांचे खरिपाखाली प्रस्तावित क्षेत्र ७ लाख २८ हजार ११२ लक्ष हेक्टर असून, सोयाबीन, कापूस, तूर ही प्रमुख पिके असून सोयाबीन २ लाख ७० हजार हेक्टर, कापूस २ लाख ६१ हजार हेक्टर व तूर १ लाख ३० हजार हेक्टर आणि मूग, उडीद, ज्वारी व इतर पिकांचे ६७ हजार ११२ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे.

मागील हंगामात माहे सप्टें २०२०पासून सोयाबीन या पिकाचे स्वत:चे बियाणे स्वत: जतन करण्याबाबत जिल्ह्यात विस्तार यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली असून, त्यामध्ये शेतकऱ्यांनी ९२६२० क्विंटल सोयाबीन बियाणे जतन करून ठेवलेले आहे.एकूण २.७० लक्ष हेक्टरससाठी ७५ किलो प्रति हेक्टरप्रमाणे २ लाख १५००० क्विंटल बियाणे पेरणीसाठी लागणार असून, बियाणे बदलाचे प्रचलित प्रमाणानुसार १ लाख ३० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. 

घरातील सोयाबीन वापरा
सोयाबीनवर बियाणे, खते, कीटकनाशके व इतर निविष्ठांचा होणारा खर्च विचारात घेता सोयाबीन ऐवजी मूग, उडीद, चवळी, ज्वारी, तीळ या कमी खर्चाच्या पर्यायी पिकांचा अवलंब करणे सुद्धा फायदेशीर ठरू शकते. त्यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढील हंगामात स्वत:कडील सोयाबीन उगवणक्षमता तपासून पेरणीसाठी वापरणे, बियाणे बचतीसाठी पट्टापेर पद्धत ४ ओळीनंतर रिकामी सरी सोडणे, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने पेरणी, आंतरपिकाचे प्रमाण वाढविणे इत्यादी बाबींचा अवलंब करून सोयाबीन बियाणेत बचत करून तसेच सोयाबीनऐवजी मुग, उडीद, बरबटी, ज्वारी, तीळ या कमी खर्चाच्या पर्यायी पिकांची पेरणी करून आपल्या खर्चात बचत करून शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी नियोजन करावे.

सोयाबीन व इतर पीक पेरणीपूर्वी बियाणेला रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशक व जिवाणू संघाची प्रक्रिया करूनच पेरणी करावी. १०० मी.मी. पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. सोयाबीन पेरणी ३-४ से.मी. पेक्षा जास्त खोलीवर केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सोयाबीन, मुग, उडीद, तूर या शेंगवर्गिय पिकांमध्ये युरियाचा वापर अत्यंत मर्यादित करावा तसेच इतर पिकांमध्ये सुद्धा फुलोरा येण्याच्या कालावधीनंतर युरियाचा वापर पूर्णतः: टाळावा.

महागड्या कीटकनाशकांवर खर्च करण्यापेक्षा लिंबोळ्या गोळा करून त्याचा कीड संरक्षणासाठी वापर करावा. शेतीमध्ये होणाऱ्या अनावश्यक खर्चात‍ कपात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...