औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप संकटात

औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप संकटात
औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप संकटात

औरंगाबाद : पावसाच्या प्रदीर्घ खंडासोबतच किडी रोगांसाठी पोषक वातावरणामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील यंदाच्या खरिपावर संकटाचा डोंगर उभा आहे. उपाय योजतांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत काही दिवसांत पाऊस पडला असला तरी निसर्गाची अपेक्षित साथ मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील संकटाचे ढग कायमच असल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यात स्थिती विदारक आहे. प्रदीर्घ खंडानंतर १५ ऑगस्टनंतर तालुक्‍यात पावसाचे आगमन झाले असले तरी तालुक्‍यातील १३७ गावातील खरिपाच्या पिकांना या पावसाचा फायदा होण्याची शक्‍यता नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. प्रदीर्घ खंडामुळे तालुक्‍यातील ४० हजार ५०५ हेक्‍टर खरिपाचे क्षेत्र बाधित झाले आहे.

वैजापूर तालुक्‍यातील कपाशी व मकाच्या उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपर्यंत तर औरंगाबाद तालुक्‍यात २० ते ३० टक्‍के घट होण्याचा अंदाज आहे. फुलंब्री तालुक्‍यातील पीरबावडा मंडळातील सहा गावांत ५०० हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील मकाचे पीक बाधित झाले असून कपाशी व मका पीक २० ते २५ टक्‍के घट होण्याचा अंदाज आहे. पैठण तालुक्‍यातील लोहगाव, बालानगर, बीडकीन व ढोरकीन मंडळातील काही गावात खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्रावर पेरणी होऊच शकली नाही. या मंडळांमधील ११ गावांमधील विविध पिकांचे ६८६ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे पुढे आले आले आहे.

बोंड अळीची नुकसानीत भर खुलताबाद तालुक्‍यातील सुलतानपूर व वेरूळ मंडळातील २२ गावांतील मका पिकाला पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. या पिकाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. कन्नड व सोयगाव तालुक्‍यांतील १४ गावांतील कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रमाणाने नुकसानीची पातळी ओलांडली आहे.

 औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ः ६ लाख ८३ हजार ३७५ हेक्‍टर  प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र ः ६ लाख ५८ हजार ६०७ हेक्‍टर

पिकाचे नाव अाणि अंदाजे नुकसान हेक्टरमध्ये
कपाशी ३८८८८४
सोयाबीन  १५१८०
बाजरी २४९३०
मका १७३१६२
तूर ३०३९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com