agriculture news in marathi, Kharif crisis in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील खरीप संकटात

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पावसाने अद्यापही दमदार हजेरी न लावल्याने खरिप हंगामातील पिके पाण्याअभावी माना टाकू लागल्या आहेत. विशेषतः ऊस, डाळिंब, चारापिके यांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाने चांगली सुरवात केली; पण त्यानंतर त्याने दडी मारली. पावसाळी हंगामातील दोन महिने हातचे गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पावसाने अद्यापही दमदार हजेरी न लावल्याने खरिप हंगामातील पिके पाण्याअभावी माना टाकू लागल्या आहेत. विशेषतः ऊस, डाळिंब, चारापिके यांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाने चांगली सुरवात केली; पण त्यानंतर त्याने दडी मारली. पावसाळी हंगामातील दोन महिने हातचे गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०० मिलिमीटर आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरी २०० मिलिमीटर पावसाची गरज होती. पण त्या तुलनेत दोन महिन्यांत आतापर्यंत १०९.७९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १७० मिलिमीटर पाऊस झाला होता. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर यंदा पावसाची अजूनही किती गरज आहे, हे लक्षात येते.

मध्यंतरी हलका ते मध्यम पाऊस झाला. मात्र जोर नसल्याने पिकासाठी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जिल्ह्यात अलिकडे खरिपातही बऱ्यापैकी पेरण्या होत आहेत. यंदा ७९ हजार हेक्‍टर इतक्या निश्‍चित क्षेत्राच्या जवळपास दुप्पट २०० टक्‍क्‍यांपर्यंत १ लाख ६२ हजार ६६१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हा सगळा पेरा केवळ पावसाच्या भरवशावर झाला आहे. पण आता पाऊसच लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने खरिपामध्ये तूर व सोयाबीन या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. साहजिकच त्याचा परिणाम रब्बीच्या पेरणीवर होत असल्याचे दिसून येते. तुरीसाठी २४ हजार ४५ हेक्‍टर क्षेत्र निश्‍चित केले असताना प्रत्यक्षात २१ हजार हेक्‍टरपेक्षाही अधिक क्षेत्रावर वर त्याची पेरणी झाली आहे. तर सोयाबीनसाठी केवळ पाच हजार ५०० हेक्‍टर क्षेत्र निश्‍चित असताना त्याच्याही चौपट क्षेत्रावर पेरणी झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण वाढतेय...पठारी प्रदेशात वातावरणातील धुलिकणांची पातळी...
राज्याबरोबर केंद्राच्या मदतीची गरजः शरद...उमरगा, जि. उस्मानाबाद: नैसर्गिक आपत्तीच्या...
साताऱ्यात पावसाने बटाटा पीक गेले वाहूनविसापूर, जि. सातारा ः पुसेगावसह (ता. खटाव)...
परभणी जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर...परभणी ः यंदाच्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर...
दोन लाख रुपयांवरील थकबाकीदारांना...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः दोन लाख रुपयांपेक्षा...
पुणे जिल्ह्यात अठरा हजार हेक्टरवर...पुणे ः गेल्या तीन दिवसांपासून पावसाने काहीशी...
मदतीची घोषणा, की आश्वासनांनी बोळवण?...सोलापूर ः जोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्याने...
नगरमध्ये रब्बी ज्वारीचे तीन हजार...नगर ः रब्बी ज्वारीचे सुधारित बियाणे पेरणी होऊन...
धानाला १००० रुपये बोनस द्या;...भंडारा : निविष्ठांच्या दरात झालेली वाढ, कीड...
राजारामबापू कारखाना उसाचे २५ लाख टन...इस्लामपूर, जि. सांगली : राज्याचे जलसंपदामंत्री,...
ऊस तोडणी हंगामात पावसाचा अडथळाकोल्हापूर : शासनाने गुरुवार (ता. १५) पासून ऊस...
नाशिक जिल्ह्यात हमीभावाने होणार बाजरी...येवला, जि. नाशिक : शासकीय भरड धान्य खरेदी...
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे ः डॉ....आळसंद, जि. सांगली :  शेतकऱ्यांनी आता...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
कृषी सल्ला (भात, आंबा, काजू, नारळ,...नुकत्याच झालेल्या मेघगर्जना आणि विजेच्या...
बटाटा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास बटाटा...
आरोग्यदायी चंदनलेप लावण्यासाठी रक्तचंदन उगाळून वापरले जाते....
अकोला जिल्ह्यात सोयाबीनच्या सोंगणी,...अकोला ः परतीच्या पावसाने सोयाबीन हंगामाची...
यवतमाळ जिल्ह्यातील पांदण रस्ते पूर्ण...यवतमाळ  : ‘‘‘पालकमंत्री पांदणरस्ते’...
नांदेड जिल्ह्यात एक लाख हेक्टर पिकांचे...नांदेड : ऑक्टोबर महिन्यात सलग आठ दिवस...