Kharif crop insurance scheme implemented for Nanded district
Kharif crop insurance scheme implemented for Nanded district

नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना लागू

नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम पंतप्रधान पीकविमा योजना सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांना लागू करण्यात आली. कर्जदार; तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत (ता.३१) आहे.

नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम पंतप्रधान पीकविमा योजना सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांना लागू करण्यात आली. कर्जदार; तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत (ता.३१) आहे. 

शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी, अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले. यंदा खरीप पीकविमा योजना कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे.

खरीप हंगामातील इतर पिकांसाठी २ टक्के; तर कापसासाठी ५ टक्के विमा हप्ता ठेवण्यात आला आहे. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर (उंबरठा उत्पादन पातळीपर्यंत) ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आपत्ती, आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग आदींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणीपश्चात नुकसान आदींचा या योजनेत समावेश आहे.

शेतकऱ्यांना संबंधित बॅंका, जनसुविधा केंद्रांद्वारे, पीकविमा पोर्टलवर स्वतः शुक्रवारपर्यंत (ता.३१) पीकविमा प्रस्ताव सादर करता येतील.

पीकनिहाय विमा योजना स्थिती

पीक विमा संरक्षित रक्कम  विमा हप्ता
सोयाबीन  ४५०००  ९००
कापूस ४५००० २२५०
तूर ३५००० ७००
मूग २००००  ४००
उडीद   २००००  ४००
ज्वारी  २५००० ५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com