agriculture news in marathi, Kharif crops affected by heavy rains | Agrowon

शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार हजेरी लावत खरीप पिकांना दणका दिला आहे. मराठवाडा कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. खरिपाच्या काढणीस आलेल्या पिकांचे  भिजून मोठे नुकसान झाले आहे. काढून ठेवलेली सोयाबीन, भात, कापूस, ज्वारी पिके पाण्यात गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. जालना जिल्ह्यातील सातोना येथे १७४ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यातील तांदूळजा येथे १७० मिलिमीटर, परभणी जिल्ह्यातील देऊळगाव (ता.सेलू) येथे १६५, तर सेलूत १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  

पुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार हजेरी लावत खरीप पिकांना दणका दिला आहे. मराठवाडा कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. खरिपाच्या काढणीस आलेल्या पिकांचे  भिजून मोठे नुकसान झाले आहे. काढून ठेवलेली सोयाबीन, भात, कापूस, ज्वारी पिके पाण्यात गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. जालना जिल्ह्यातील सातोना येथे १७४ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यातील तांदूळजा येथे १७० मिलिमीटर, परभणी जिल्ह्यातील देऊळगाव (ता.सेलू) येथे १६५, तर सेलूत १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  

मराठवाड्यातील परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील १६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. ओढे, नाले, नद्यांचे पाणी पिकांमध्ये शिरल्याने सोयाबीन, कपाशी, ज्वारी, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले. सेलू तालुक्यातील सर्व पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जालन्यातील वाघ्रुळ जहागीर, दाभाडी, हसनाबाद, परतूर, सातोना व श्रीष्टी येथे अतिवृष्टी झाली. सातोना येथे १७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर तालुक्यातील तांदूळजा महसूल मंडळात १७० तर चिंचोली महसूल मंडळात ११२ मिलिमीटर पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे या मंडळातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे मांजरा नदीलाही पाणी आले आहे. या पाऊस रब्बीसाठी चांगला असला तरी खरिपातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील पूर्णा नदीवर असलेले घुंगशी बंधारा भरल्याने नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात भिजल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतात काढणीनंतर मळणीसाठी गंजी लावून ठेवलेले सोयाबीन पीक भिजले आहे. 
सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सर्वच पाणीच पाणी झाले असून, काढणीला पिकांत साचल्यामुळे नुकसान सुरू आहे. सध्या खरिपातील पिकांची काढणी सुरू असून, शेतातील कामे ठप्प झाली आहेत. सोयाबीन, भात, स्ट्रॉबेरी, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढे-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडून जवळच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान केले. सोयाबीन भिजले असून ज्वारी काळी पडू लागली. आले व हळदीच्या पिकांत पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. 

पुणे जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस पडत असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वीर, घोड, नाझरे, उजनी, भामा आसखेड या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसणार आहे. काढणीस आलेले सोयाबीन, मका, बाजरीसह, भुईमूग, बटाटा, फुलशेती भाजीपाला पिकांत पाणी साचल्याने मोठे नुकसान होणार आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. अतिवृष्टी अकोले तालुक्यात भातासह जिल्हाभरात काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. शनिवारी दिवसभर अनेक ठिकाणी पाऊस पडला. कर्जत, शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले भागात झालेल्या पावसामुळे कापूस, बाजरी, भाताचे नुकसान होत आहे. मात्र रब्बीतील ज्वारीसह अन्य पेरणीला वेग येण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतीकामाचे नियोजन विस्कळित झाले आहे. संततधार पावसामुळे सुरू असलेली खरीप पिकांच्या मळणीची कामे ठप्प झाली आहेत. येत्या काही दिवसांत या पावसाचा विपरीत परिणाम शेतीच्या सर्व कामावर होणार आहे. काढणीला आलेली खरीप पिके तशीच शेतात राहिल्याने ती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गुऱ्हाळांनाही बसत आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात गेले चार ते पाच दिवस जिल्ह्यात पडलेल्या पावसाने कापणीला आलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेकडो एकर उभी शेतं आडवी झाली आहेत. भातामध्ये दाणे भरले असून, पावसात भिजल्याने संपूर्ण पीक शेतात आडवे होते. शेतात पाणी साचले असल्याने भाताचे दाणे पाण्यात भिजून मोड फुटण्याची भीती आहे. 

इतर बातम्या
शिवसेनेचा दावा; सत्तास्थापनेचा पेच कायममुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे...
संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम...नाशिक  : ‘नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढकोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ...