अकोल्यात खरीप पिकांना मिळेल वाढीव पीककर्ज

आगामी खरीप हंगामासाठी पिककर्जाचा दर निश्‍चित करण्यात आला असून, कापसाला हेक्टरी १६ हजारांपर्यंत वाढीव स्वरूपात पीककर्ज मिळू शकते. राज्यस्तरीय समितीने नुकतेच हे दर निश्‍चित केले आहेत.
अकोल्यात खरीप पिकांना मिळेल वाढीव पीककर्ज Kharif crops in Akola Will get increased peak loans
अकोल्यात खरीप पिकांना मिळेल वाढीव पीककर्ज Kharif crops in Akola Will get increased peak loans

अकोला : आगामी खरीप हंगामासाठी पिककर्जाचा दर निश्‍चित करण्यात आला असून, कापसाला हेक्टरी १६ हजारांपर्यंत वाढीव स्वरूपात पीककर्ज मिळू शकते. राज्यस्तरीय समितीने नुकतेच हे दर निश्‍चित केले आहेत. यंदा बागायती कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ६९ हजार रुपये पीककर्ज बँकांकडून मिळू शकणार आहे. लवकरच जिल्हा अग्रणी बँकेकडून खरीप व रब्बी हंगामासाठी होणाऱ्या पीककर्ज वाटपाचे नियोजन निश्‍चित केले जाणार आहे.

एप्रिल महिना उजाडताच खरीपाच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. नवीन हंगामासाठी पीककर्ज वाटपाच्या हालचाली सुरू झाल्या. वाढता खर्च लक्षात घेता यंदाच्या पीककर्ज वितरणात थोडी वाढ करण्यात आली आहे. प्रामुख्याने कपाशी पिकाला मिळणारे पीककर्ज जवळपास १६ हजारांनी हेक्टरी वाढविण्यात आले. सोयाबीनच्या पिककर्जातही चार हजारांची हेक्टरी वाढ दिसून येत आहे. राज्य शासनाने दिलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकरी कर्जमुक्त झाल्याने यंदाच्या पीककर्ज मिळवण्यास पात्र ठरणार आहेत.

गेल्यावर्षात जिल्ह्यात ७५ टक्क्यांवर खातेदार शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज वितरित झाले होते. या वर्षासाठी राज्यस्तरीय समितीने पीककर्ज वितरणाचे नियोजन आखताना पीक कर्जाचे दर निश्‍चित करीत पीकनिहाय हेक्टरी काही रकमेची वाढ केली. गेल्या हंगामात जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा सुमारे १२०० कोटींचा लक्षांक होता. गेल्या वर्षांत या उद्दिष्टापैकी ९०५ कोटींचे पीककर्ज वाटप झाले होते.

इतर पिकांसाठी नवीन दर मका ३० हजार रुपये हेक्टरी, मिरची ७५ हजार हेक्टरी, टोमॅटो ८० हजार, कांदा ६५ हजार, हळद १ लाख ५ हजार, कोबी ४२ हजार, फूल पिके ३६ ते ४० हजार, केळी १ लाख रुपये, संत्री ८८ हजार, बाजरी १६ हजार.

पीकनिहाय प्रतिहेक्टरी पीककर्ज दर    

  • पीक    सध्याचा दर (नवीन दर)
  • कापूस (बागायती)    ५३००० (६९०००)
  • कापूस (जिरायती)    ४३००० ( ५२०००)
  • सोयाबीन    ४५००० (४९०००)
  • खरीप ज्वारी (जिरायती)    २५००० (२७०००)
  • तूर (जिरायती)    ३१५०० (३५०००)
  • उडीद (जिरायती)    १९००० (२००००)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com