agriculture news in marathi, Kharif at an estimated 200,000 hectares | Agrowon

सांगली : सव्वातीन लाख हेक्‍टरवर खरीप नियोजन
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

सांगली : यंदा वळवाच्या पावसाने दडी मारली. मॉन्सूनही वेळेत दाखल होणार की नाही, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. शेतकऱ्यांचे खरीप हंगामाकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात यंदा खरिपासाठीचे क्षेत्र ३ लाख ४८ हजार हेक्‍टरवर असेल. त्या दृष्टीने कृषी विभागातर्फे तयारी सुरू आहे. 

सांगली : यंदा वळवाच्या पावसाने दडी मारली. मॉन्सूनही वेळेत दाखल होणार की नाही, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. शेतकऱ्यांचे खरीप हंगामाकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात यंदा खरिपासाठीचे क्षेत्र ३ लाख ४८ हजार हेक्‍टरवर असेल. त्या दृष्टीने कृषी विभागातर्फे तयारी सुरू आहे. 

ज्वारीचे सर्वाधिक ६० हजार ८७२ हेक्‍टर क्षेत्र असून, त्यापाठोपाठ सोयाबीनचा पेरा ५७ हजार १६१ हेक्‍टरवर होईल. हंगामासाठी सव्वा लाख टन खतपुरवठा अपेक्षित आहे. ४७ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी कंपन्यांकडून खते आणि बियाण्यांचा पुरवठा सुरू आहे. खरिपात खते व बियाण्यांची टंचाई निर्माण होणार नाही, याकडेही प्रशासनाचे लक्ष आहे. 

जत, आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. ज्वारीचे ६० हजार ८७२ हेक्‍टर क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी बाजरीचेही उत्पन्न घेतले जाते. ४३ हजार १९२ हेक्‍टर क्षेत्र उपलब्ध आहे. पेरणी पावसावर अवलंबून असल्याने वेळेत मॉन्सून दाखल झाल्यास शंभर टक्के पेरा पूर्ण होण्याच्या आशा आहेत. 

शिराळा तालुक्‍याला पावसाचे प्रमाण जास्त असते. येथे भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. या वर्षी १७ हजार ३८७ हेक्‍टर क्षेत्र उपलब्ध असून, उन्हाळी पावसानंतर धूळवाफेवर पेरणी केली जाते. मागील काही वर्षांत मक्‍याचे क्षेत्रही वाढले आहे. चालू वर्षीही ३० हजार २९८ हेक्‍टरवर मक्‍याची पेरणी होण्याचा अंदाज आहे.

भाताचे साडेपाच हजार क्विंटल बियाण्यांचे कृषी विभागाने नियोजन केले. त्यापैकी सध्या चाळीस टक्के बियाणे उपलब्ध आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज पूर्व, खानापूर तालुक्‍यांत तूर, मूग, उडीद, भुईमुगाच्या आदी पेरणीचे क्षेत्र आहे. त्यादृष्टीने येथे कडधान्याचे बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे. 

खरिपाचे पीकनिहाय क्षेत्र 

पीक क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
ज्वारी ६०,८७२ 
सोयाबीन  ५७,१६१
बाजरी ४३,१९२
भुईमूग २७,४८६ 
भात १७,३८७
मका ३०,२९८
तूर  ६,९१९ 
मूग  ७,६६९ 
उडीद ८,३६८
सूर्यफूल  १,२८९

 

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...