Agriculture news in marathi Kharif insurance sanctioned to farmers on Rs 23 lakh | Agrowon

लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा मंजूर

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २३ लाख ६ हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे.

उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २३ लाख ६ हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. जवळपास निम्म्या शेतकऱ्यांनाच विमा परतावा मंजूर झाला आहे.

खरीप हंगाम २०१९-२० मध्ये या पाच जिल्ह्यातील ४६ लाख २ हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील १० लाख ८२ हजार, उस्मानाबाद ११ लाख ८६ हजार, नांदेड ११ लाख ९२ हजार, परभणी ८ लाख २१ हजार, तर हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ४० हजार शेतकऱ्यांचा समावेश होता. २३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. 

लातूर जिल्ह्यातील ६ लाख १८ हजार हेक्टर, उस्मानाबाद ५ लाख ७६ हजार हेक्टर, नांदेड ५ लाख ७८ हजार हेक्टर, परभणी ४ लाख ३० हजार हेक्टर, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ५० हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश होता. जवळपास ८ हजार ५८१ कोटी रुपये विमा संरक्षित रकमेसाठी १८४ कोटी रुपये विमा हप्ता भरला गेला होता.

प्राप्त माहितीनुसार,  पाच जिल्ह्यातील २३ लाख ६ हजार शेतकऱ्यांना १९४६ कोटी रुपये विमा परतावा मंजूर आहे. विमा परताव्याची ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...