नाशिक जिल्ह्यात २८ टक्केच खरीप कर्जवाटप

जिल्ह्यात २८ टक्केच खरीप कर्जवाटप
जिल्ह्यात २८ टक्केच खरीप कर्जवाटप

नाशिक : खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला, तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३० हजार ६८४ शेतकऱ्यांना ७३२ कोटी ७३ लाखांचे कर्जवाटप झाले आहे. त्याची टक्केवारी फक्त २७.९१ टक्के आहे. पीककर्जासाठी बँकांनी २६२५ कोटी ७० लाखांचे लक्ष्य ठेवले असताना प्रत्यक्षात वाटप कमी आहे. बँकांनी विविध कारणांनी शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याचे बोलले जात आहे.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सर्व बँकांची बैठक घेऊन जास्तीत जास्त कर्जवाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या. ४  जुलैपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकेने १६ हजार १३० शेतकऱ्यांना ४६१ कोटी ३२ लाख कर्जवाटप केले असून त्याची टक्केवारी २४. ८० आहे. त्यांना १८५९ कोटी ८२ लाखांचे लक्ष्यांक देण्यात आला होता. ग्रामीण बँकांनी १ कोटी ५ लाख कर्ज ६८ शेतकऱ्यांना, खासगी बँकांनी ५१ कोटी ३१ लाख कर्ज २ हजार ५० शेतकऱ्यांना आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेने २१९ कोटी ५ लाखांचे कर्ज १२ हजार ४३६ शेतकऱ्यांना वाटप केले आहे. त्यांनी अनुक्रमे ३४७ कोटी ८० लाख, ४०४ कोटी ६५ लाख, १३ कोटी ४३ लाख रुपयांचे कर्जवाटप लक्ष्यांक ठरवले होते.

जिल्हा बँकेची अडचण गेल्या वर्षी ४ हजार ११ कोटींचे लक्ष्यांक बँकेने ठेवले होते. त्यात जिल्हा बँकेचा आकडा मोठा होता. या वेळेस ती अडचणीत असल्यामुळे हात आखडते घेतले. त्यामुळे यंदा कर्जवाटपावर   परिणाम झाला. कर्जवसुलीचे प्रमाणही कमी असल्यामुळे बँकेची अडचण झाली आहे.

बँकांचे नियम अवघड राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांचे नियम व अटी किचकट असल्यामुळे त्यातून कर्जवाटप कमी होते. त्याचप्रमाणे पीककर्ज देण्यासाठी या बँकाही फारशा उत्सुक नसल्याने कर्जवाटपाची टक्केवारी कमी आहे.

पेरण्या २७.११ टक्के पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यात ६ लाख ५२ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ७६ हजार ९२८ हेक्टरवर पेरणी  झाली असून, त्याची टक्केवारी २७.११ टक्के आहे. जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटही पावसामुळे निर्माण झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com