पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार हेक्टरवर लागवड

पुणेः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. यामुळे कांद्याचे दर जवळपास चार हजार रूपये क्विंटलपर्यंत वाढले आहेत. यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहेत.
Kharif onion is cultivated on 40,000 hectares in Pune division
Kharif onion is cultivated on 40,000 hectares in Pune division

पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. यामुळे कांद्याचे दर जवळपास चार हजार रूपये क्विंटलपर्यंत वाढले आहेत. यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहेत. पावसाने उघडीप दिल्याने कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे. आत्तापर्यंत पुणे विभागात ३९ हजार २७१ हेक्टरवर कांदा लागवड झाली असल्याचे चित्र आहे.

दरवर्षी शेतकरी जून महिन्यापासून कांदा लागवडीची तयारी करतात. त्यासाठी नांगरट, रोपवाटिका, बियाणांची खरेदी करणे आदी कामे मे, जून महिन्यात करतात. कांद्याची जून, जुलै ही खरीप कांदा, लेट खरीप कांद्याची सप्टेंबर ऑक्टोबर, तर उन्हाळी कांद्याची जानेवारी- फेंब्रुवारी महिन्यात लागवड करतात. बहुतांशी शेतकरी खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात कांद्याची लागवड करतात.

मात्र, खरीप कांद्याची पाऊस झाल्यानंतर जून-जुलैमध्ये रोपवाटिका टाकतात. बियाणे टाकल्यानंतर साधारपणपणे एक ते सव्वा महिन्यात कांद्याची रोपे लागवडीस येतात. त्यानंतर बहुतांशी शेतकरी जुलै-ऑगस्ट महिन्यात कांदा लागवड करतात. लागवडीनंतर सुमारे साडे तीन ते चार महिन्यांनी कांद्याची काढणी केली जाते.

गेल्या वर्षीही खरीप हंगामात सुमारे २१ हजार १४० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी लागवडीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. यंदा उन्हाळी हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. परंतु, उन्हाळ्यात वाढलेले तापमान आणि पावसाळ्यात दमट हवामान व आर्द्रता यामुळे कांद्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढल्याची  स्थिती आहे.  चालू वर्षी मॉन्सून लवकर दाखल झाल्याने नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात लवकर कांदा लागवडी सुरू केल्या होत्या. अनेक शेतकरी पूर्वी वाफे, साऱ्यांवर किवा सरीवर कांदा लागवड करतात.

अलिकडील काळात शेतकऱ्यांनी माहिती आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे अनेक शेतकरी कांदा लागवडीच्या तंत्रज्ञानात बदल करत आहेत. आता शेतकरी बेडवर कांदा लागवड करत असून त्यावर ठिबकने पाणी देत असल्याच्या पद्धतीचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे उत्पन्नात वाढ होत असल्याचे दिसून येते.

पुणे विभागातील कांदा लागवड (हेक्टर) 

जिल्हा झालेली लागवड
नगर २०,९६७
पुणे ५१५६
सोलापूर १३,१४८
एकूण ३९,२७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com