Agriculture news in marathi Kharif onion is cultivated on 40,000 hectares in Pune division | Agrowon

पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार हेक्टरवर लागवड

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. यामुळे कांद्याचे दर जवळपास चार हजार रूपये क्विंटलपर्यंत वाढले आहेत. यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहेत.

पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. यामुळे कांद्याचे दर जवळपास चार हजार रूपये क्विंटलपर्यंत वाढले आहेत. यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहेत. पावसाने उघडीप दिल्याने कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे. आत्तापर्यंत पुणे विभागात ३९ हजार २७१ हेक्टरवर कांदा लागवड झाली असल्याचे चित्र आहे.

दरवर्षी शेतकरी जून महिन्यापासून कांदा लागवडीची तयारी करतात. त्यासाठी नांगरट, रोपवाटिका, बियाणांची खरेदी करणे आदी कामे मे, जून महिन्यात करतात. कांद्याची जून, जुलै ही खरीप कांदा, लेट खरीप कांद्याची सप्टेंबर ऑक्टोबर, तर उन्हाळी कांद्याची जानेवारी- फेंब्रुवारी महिन्यात लागवड करतात. बहुतांशी
शेतकरी खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात कांद्याची लागवड करतात.

मात्र, खरीप कांद्याची पाऊस झाल्यानंतर जून-जुलैमध्ये रोपवाटिका टाकतात. बियाणे टाकल्यानंतर साधारपणपणे एक ते सव्वा महिन्यात कांद्याची रोपे लागवडीस येतात. त्यानंतर बहुतांशी शेतकरी जुलै-ऑगस्ट महिन्यात कांदा लागवड करतात. लागवडीनंतर सुमारे साडे तीन ते चार महिन्यांनी कांद्याची काढणी केली जाते.

गेल्या वर्षीही खरीप हंगामात सुमारे २१ हजार १४० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी लागवडीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. यंदा उन्हाळी हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. परंतु, उन्हाळ्यात वाढलेले तापमान आणि पावसाळ्यात दमट हवामान व आर्द्रता यामुळे कांद्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढल्याची
 स्थिती आहे. 
चालू वर्षी मॉन्सून लवकर दाखल झाल्याने नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात लवकर कांदा लागवडी सुरू केल्या होत्या. अनेक शेतकरी पूर्वी वाफे, साऱ्यांवर किवा सरीवर कांदा लागवड करतात.

अलिकडील काळात शेतकऱ्यांनी माहिती आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे अनेक शेतकरी कांदा लागवडीच्या तंत्रज्ञानात बदल करत आहेत. आता शेतकरी बेडवर कांदा लागवड करत असून त्यावर ठिबकने पाणी देत असल्याच्या पद्धतीचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे उत्पन्नात वाढ होत असल्याचे दिसून येते.

पुणे विभागातील कांदा लागवड (हेक्टर) 

जिल्हा झालेली लागवड
नगर २०,९६७
पुणे ५१५६
सोलापूर १३,१४८
एकूण ३९,२७१

 


इतर बातम्या
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
पाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबगपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूड परिसरात...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
खाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...