सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के क्षेत्रावर पेरणी

सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ७७ हजार ६८६ हेक्टर आहे. त्यापैकी ६९ हजार ५०७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली. मात्र, गेल्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडला.
 सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के क्षेत्रावर पेरणी Kharif in Sangli district Sowing on 25% of the area
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के क्षेत्रावर पेरणी Kharif in Sangli district Sowing on 25% of the area

सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ७७ हजार ६८६ हेक्टर आहे. त्यापैकी ६९ हजार ५०७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली. मात्र, गेल्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडला. वाफसा आला की, पेरण्यांना गती येईल. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले. उन्हाळी पाऊस समाधानकारक झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीच्या दृष्टीने पूर्व मशागती पूर्ण केल्या होत्या. काही भागात पेरणीसाठी शेती तयार होती. शेतकऱ्यांनी पेरणी देखील सुरू केली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात अवघी १० टक्के पेरणी झाली होती. जूनच्या दुसऱ्या पंधरावड्यात पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली.  दुष्काळी पट्ट्यात कडधान्याची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रामुख्याने जत तालुक्यात तुरीची पेरणी अधिक असते. तालुक्यात तुरीचे सरासरी क्षेत्र १९५५ हेक्टर इतके असून, आत्तापर्यंत २५९६ हेक्टरवर पेरा झाला आहे. तसचे मुग, उडीद याची देखील पेरणी शेतकरी करू लागले आहेत. जिल्ह्यात भूईमुगाचे सरासरी क्षेत्र २७ हजार ४८६ हेक्टर असून, ८४७२ हेक्टरवर टोकणी झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दुष्काळी भाग सोडून सर्वदूर मुसळधार पाऊस होता. शेतात पाणी साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली. शनिवारी उघडीप दिली. वाफसा आल्यानंतर शेतकरी पेरणीचे नियोजन करतील. तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)     मिरज    १५६४ जत    २८१९५ खानापूर    १२२ वाळवा    ९९१५ तासगाव    ३५९ शिराळा    २२२७२ आटपाडी    १७०३ कवठेमहांकाळ    ३०६८ पलूस    १०४३ कडेगाव    ५५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com