Agriculture news in marathi Kharif in Sangli district Sowing on ten percent of the area | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यात खरिपाची दहा टक्के क्षेत्रावर पेरणी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ झाला आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पेरा भाताचा झाला आहे. आतापर्यंत २६ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप आहे. 

सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ झाला आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पेरा भाताचा झाला आहे. आतापर्यंत २६ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे. 

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ८१ हजार हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी पूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. आता पेरणीसाठीची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी नियोजन करू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण आहे. पावसाने उघडीप दिली आहे. त्यातच कुठेतरी हलका व मध्यम पाऊस पडत आहे. मात्र, हा पाऊस पेरणीसाठी उपयुक्त नसल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे देखील कृषी विभागाने शेतकऱ्यांना सांगितले आहे. 

शिराळा तालुक्यात भात पेरणीसाठी शेतीची कामे पूर्ण झाली असून, धूळ वाफेवर भाताची पेरणी मध्यावर आली आहे. तालुक्यात १७ हजार ४०० हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी ११ हजार हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे. उर्वरित पेरणीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. या भागात भाताची उगवण देखील झाली आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पट्ट्यात आगाप सोयाबीन पेरणीची परंपरा आहे. त्यामुळे आगाप सोयाबीन पेरणी झाली आहे. सर्वाधिक भाताची पेरणी तर सर्वात 
कमी ज्वारीची पेरणी झाली आहे. 

पीकनिहाय पेरणी क्षेत्र 

  • पीक.....पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
  • भात... ...११ हजार ३०९ 
  • ज्वारी... ..४२८ 
  • बाजरी... ...२१०६ 
  • मका....... २२७६ 
  • कडधान्य.... ..१ हजार ४०१ 
  • सोयाबीन.......५ हजार २५७ 
  • भुईमूग... ..३ हजार ६३२ 
  • एकूण.... ..२६, ४१२.५० 

प्रतिक्रिया
जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पेरणी करताना उगवण क्षमता पहावी. शेतकऱ्यांनी पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. 
बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली 


इतर ताज्या घडामोडी
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...