सातारा जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू

सातारा : कोरोनाच्या धास्तीतही कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. यावेळेस ‘एक गाव एक वाण’ ही मोहीम राबविली जाणार आहे.
 Kharif in Satara district Preparations for the season begin
Kharif in Satara district Preparations for the season begin

सातारा : कोरोनाच्या धास्तीतही कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. यावेळेस ‘एक गाव एक वाण’ ही मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक गावाला कडधान्याच्या एका वाणाची लागवड करून त्यातून विविध वाण विकसित केले जाणार आहेत. युरियाच्या वारेमाप वापरावर नियंत्रण आणून सेंद्रिय व हिरवळीच्या खतांवर भर दिला जाणार आहे. 

सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीनकडेच वळतील. बियाण्याची टंचाई भासणार आहे. परिणामी कृषी विभागाने सोयाबीनचे घरचेच बियाणे पेरणीस वापरावे, असे आवाहन केले.  गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे सर्वच घटकांवर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वांना शेतीने आधार दिला आहे.

खरीप हंगामासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना वेळेत व मुबलक मिळण्यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे. प्रत्येक गावात धान्याच्या एका वाणाची पेरणी करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून विविध वाण विकसित केले जाणार आहेत. एक पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही मोहीम आहे.

यासोबत युरियाचा होणारा वारेमाप वापर रोखून केवळ दहा टक्के युरियाचा वापर करत उर्वरित सेंद्रिय खते, हिरवळीच्या खतांचा वापर वाढविला जाणार आहे. त्यासाठी बीज प्रक्रियेविषयी शेतकऱ्यांत जागृती केली जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींची माहिती दिली जाईल. 

जिल्ह्यात खरिपात सोयाबीनची सर्वाधिक लागवड होते. यंदा समाधानकारक दर मिळत असल्याने सोयाबीन शिकण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बियाणे टंचाई जाणवणार आहे. घरगुती बियाणे वापरावे, यासाठी शेतकऱ्यांत जागृती केली जात आहे. 

‘कडधान्य उत्पादन वाढविणार’

पेरणीसाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. उत्पन्न वाढण्यावर कृषी विभागाचा भर असेल. कडधान्य उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठीचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरूदत्त काळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com