agriculture news in marathi Kharif in Satara district Preparations for the season begin | Agrowon

सातारा जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

सातारा : कोरोनाच्या धास्तीतही कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. यावेळेस ‘एक गाव एक वाण’ ही मोहीम राबविली जाणार आहे.

सातारा : कोरोनाच्या धास्तीतही कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. यावेळेस ‘एक गाव एक वाण’ ही मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक गावाला कडधान्याच्या एका वाणाची लागवड करून त्यातून विविध वाण विकसित केले जाणार आहेत. युरियाच्या वारेमाप वापरावर नियंत्रण आणून सेंद्रिय व हिरवळीच्या खतांवर भर दिला जाणार आहे. 

सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीनकडेच वळतील. बियाण्याची टंचाई भासणार आहे. परिणामी कृषी विभागाने सोयाबीनचे घरचेच बियाणे पेरणीस वापरावे, असे आवाहन केले. 
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे सर्वच घटकांवर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वांना शेतीने आधार दिला आहे.

खरीप हंगामासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना वेळेत व मुबलक मिळण्यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे. प्रत्येक गावात धान्याच्या एका वाणाची पेरणी करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून विविध वाण विकसित केले जाणार आहेत. एक पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही मोहीम आहे.

यासोबत युरियाचा होणारा वारेमाप वापर रोखून केवळ दहा टक्के युरियाचा वापर करत उर्वरित सेंद्रिय खते, हिरवळीच्या खतांचा वापर वाढविला जाणार आहे. त्यासाठी बीज प्रक्रियेविषयी शेतकऱ्यांत जागृती केली जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींची माहिती दिली जाईल. 

जिल्ह्यात खरिपात सोयाबीनची सर्वाधिक लागवड होते. यंदा समाधानकारक दर मिळत असल्याने सोयाबीन शिकण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बियाणे टंचाई जाणवणार आहे. घरगुती बियाणे वापरावे, यासाठी शेतकऱ्यांत जागृती केली जात आहे. 

‘कडधान्य उत्पादन वाढविणार’

पेरणीसाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. उत्पन्न वाढण्यावर कृषी विभागाचा भर असेल. कडधान्य उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठीचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरूदत्त काळे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...