खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट 

खरीप हंगामातील पिके काढणीसाठी तयार होत असतानाच पाऊस सुरू असल्याने नुकसान होत आहे. वेचणीस आलेल्या कापसाचे नुकसान होत आहे.
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट  On kharif season harvest Dark showers of rain
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट  On kharif season harvest Dark showers of rain

नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके काढणीसाठी तयार होत असतानाच पाऊस सुरू असल्याने नुकसान होत आहे. वेचणीस आलेल्या कापसाचे नुकसान होत आहे. अगोदरच सततच्या पावसामुळे उभ्या कपाशीवर लाल्या व करपा वाढलेला आहे. आता सगळीकडे एकाच वेळी कापूस वेचणीला सुरुवात झाल्‍याने मजुरांची टंचाई भासत आहे. मजुरीदेखील वाढली आहे.  बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा तालुका हा कापूस पट्टा असून, परिसरातील मलकापूर, मोताळा व खामगाव तालुक्यांतही कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रावर झालेली आहे. गेल्या दोन वर्षांत निसर्गाची वक्रदृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही पडलेले नाही. सध्या खरीप हंगामातील पिके काढणीवर असून, याचवेळी पावसाच्या आगमनामुळे बळीराजाला हवालदील करून सोडले आहे.  गणपती आगमनाच्या अगोदर नांदुरा तालुक्यातील संपूर्ण परिसरात वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी खरिपातील पिके कोलमडून गेली आहेत. सोबत याच जास्तीच्या पावसामुळे कपाशीवर लाल्या व करप्याचे संकट कोसळल्‍याने हाती आलेला हंगाम संपुष्टात आल्यात जमा आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीला पानही शिल्लक नसून, उभी कपाशी वाळून गेल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट येण्याची शक्यता आहे.  कापसाचा खर्च पाहता सातशे ते आठशे प्रमाणे एकरी दोन बॅग बिटी बियाणे, तीन वेळेस रासायनिक खतांचा डोस, फवारणीचा वेगळा खर्च सोबतच शेतीची मशागत ते निंदण, खुरपणी, डवरणीपर्यंतचा खर्च व मजुरीचे दर झालेला आहे. सध्या कापूस खरेदीचा मुहूर्त साधत खासगी व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करू लागले. सध्या कापसाला केवळ पाच हजार ते साडेपाच हजार रुपये क्विंटलचा भाव असल्याची माहिती आहे. 

सोयाबीनची चिंता  सोयाबीन उत्‍पादक शेतकऱ्यांना यंदाही वाईट अनुभव येत असून आहे. पीक घरात येण्याच्‍या वेळी पावसाने केलेली फटकेबाजी शेतकऱ्यांच्या स्‍वप्‍नांची राखरांगोळी होत आहे. काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com