Agriculture News in Marathi On kharif season harvest Dark showers of rain | Page 2 ||| Agrowon

खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

खरीप हंगामातील पिके काढणीसाठी तयार होत असतानाच पाऊस सुरू असल्याने नुकसान होत आहे. वेचणीस आलेल्या कापसाचे नुकसान होत आहे.

नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके काढणीसाठी तयार होत असतानाच पाऊस सुरू असल्याने नुकसान होत आहे. वेचणीस आलेल्या कापसाचे नुकसान होत आहे. अगोदरच सततच्या पावसामुळे उभ्या कपाशीवर लाल्या व करपा वाढलेला आहे. आता सगळीकडे एकाच वेळी कापूस वेचणीला सुरुवात झाल्‍याने मजुरांची टंचाई भासत आहे. मजुरीदेखील वाढली आहे. 

बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा तालुका हा कापूस पट्टा असून, परिसरातील मलकापूर, मोताळा व खामगाव तालुक्यांतही कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रावर झालेली आहे. गेल्या दोन वर्षांत निसर्गाची वक्रदृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही पडलेले नाही. सध्या खरीप हंगामातील पिके काढणीवर असून, याचवेळी पावसाच्या आगमनामुळे बळीराजाला हवालदील करून सोडले आहे. 

गणपती आगमनाच्या अगोदर नांदुरा तालुक्यातील संपूर्ण परिसरात वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी खरिपातील पिके कोलमडून गेली आहेत. सोबत याच जास्तीच्या पावसामुळे कपाशीवर लाल्या व करप्याचे संकट कोसळल्‍याने हाती आलेला हंगाम संपुष्टात आल्यात जमा आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीला पानही शिल्लक नसून, उभी कपाशी वाळून गेल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट येण्याची शक्यता आहे. 

कापसाचा खर्च पाहता सातशे ते आठशे प्रमाणे एकरी दोन बॅग बिटी बियाणे, तीन वेळेस रासायनिक खतांचा डोस, फवारणीचा वेगळा खर्च सोबतच शेतीची मशागत ते निंदण, खुरपणी, डवरणीपर्यंतचा खर्च व मजुरीचे दर झालेला आहे. सध्या कापूस खरेदीचा मुहूर्त साधत खासगी व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करू लागले. सध्या कापसाला केवळ पाच हजार ते साडेपाच हजार रुपये क्विंटलचा भाव असल्याची माहिती आहे. 

सोयाबीनची चिंता 
सोयाबीन उत्‍पादक शेतकऱ्यांना यंदाही वाईट अनुभव येत असून आहे. पीक घरात येण्याच्‍या वेळी पावसाने केलेली फटकेबाजी शेतकऱ्यांच्या स्‍वप्‍नांची राखरांगोळी होत आहे. काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.  

 
 


इतर बातम्या
परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन काढणी...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन...
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या...
‘एफआरपी’ ८०-२०च्या सूत्रानुसार  दिल्यास...माळेगाव, जि. पुणे : ‘‘केंद्र व राज्य सरकारने यंदा...
`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२०...कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी...
  ‘महाबीज’च्या बीजोत्पादन ...परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा...
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या हिंगोली : मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी...
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका...
मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने...मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या...
विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍...अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता...
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
  ‘डीएपी’ महागणार नाही पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक...
दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा...नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप...
हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू...