हिंगोलीत खरिपात साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

हिंगोलीत खरिपात साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित
हिंगोलीत खरिपात साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या २०१९-२० खरीप हंगामात तीन लाख ४८ हजार १५७ हेक्टरवर पेरणी होईल, असे गृहित धरून कृषी विभागातर्फे नियोजन केले जात आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारी, मका ही तृणधान्ये, तूर, मूग, उडीद ही कडधान्याच्या क्षेत्रात तसेच जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या हळदीच्या क्षेत्रात दोन हजार हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी माहिती दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये २०१९-२० च्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षेतेखाली सोमवारी (ता. ८) झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी अंकुश डुबल, सहकार विभाग, अग्रणी बॅंक, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ८४ हजार ४५६ हेक्टर आहे. गतवर्षी (२०१८) मध्ये तीन लाख ४७ हजार ५९६ हेक्टरवर पेरणी झाली होती. कृषी विभागातर्फे यंदा जिल्ह्यात तीन लाख ४८ हजार १५७ हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे.

सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८६ हजार ७८१ हेक्टर असताना यंदा दोन लाख ३४ हजार ८२९ हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. सोयाबीच्या क्षेत्रात २ हजार हेक्टरने घट होण्याची चिन्हे आहेत. कपाशीचे सरासरी क्षेत्र ८२ हजार २३१ हेक्टर आहे. परंतु, यंदा कपाशीच्या क्षेत्रात २ हजार ५९८ हेक्टरने घटीची शक्यात लक्षात ४३ हजार ६८४ हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. कडधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६८ हजार ९३० हेक्टर आहे. यंदा मूग, उडीद, तूर या कडधान्याच्या क्षेत्रात वाढ होईल. त्यामुळे यंदा एकूण कडधान्याच्या क्षेत्रात २ हजार ८९५ हेक्टरची वाढ गृहित धरण्यात आली आहे. तृणधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ४४ हजार ५१ हेक्टर आहे.

हिंगोली जिल्हा खरीप हंगाम पीकनिहाय सर्वसाधारण, प्रस्तावित पेरणी लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक सर्वसाधारण क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र
सोयाबीन १८६७८१ २३४८२९                      
कपाशी ८२६३१ ४३६८४
मूग १७१३३ ९७६०
उडीद १६२४५ ८००३
तूर ३४९२२ ४३११०
ज्वारी ४०६२७ ६३३९
मका १२३१ १६२३
बाजरी १३१ ७८
तीळ ९०० २३१
कारळे ४४२ ७१ 
हळद .... ३६२९९

यंदा कडधान्य, तृणधान्याच्या क्षेत्रात वाढ होईल. तुलनेने कमी पाण्यावर हळदीचे किफायतशीर उत्पादन मिळत आहे. शिवाय चांगले दरसुद्धा मिळत आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील हळदीच्या क्षेत्रात दोन हजार हेक्टरने वाढ प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.- व्ही. डी. लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com