नगर जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर खरीप पेरणी
नगर जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर खरीप पेरणी

नगर जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर खरीप पेरणी

नगर  : नगर जिल्ह्यामध्ये यंदा अजूनही पुरेसा पाऊस नसल्याचा खरीप पेरणीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत खरिपाची ७३ टक्के म्हणजे तीन लाख ४९ हजार ८६९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र बाजारीचे क्षेत्र कमी आहे. मूग, उडीद, तुरीची पेरणी जास्ती झाली आहे. आता पाऊस नसल्याने पेरलेले अडचणीत आहे. कापसाची लागवडीही कमीच झाली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये यंदाही पावसाच्या अवेळी पणाचा खरिपाच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. यंदा आतापर्यंत खरिपाची ४ लाख ७८ हजार ६३८ हेक्‍टर क्षेत्रापैकी ३ लाख ४९ हजार ८६९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीचे सर्वाधिक १ लाख ८२ हजार हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा मात्र बाजरीचे कमी क्षेत्र पेरले आहे. आतापर्यंत ७५ हजार २६० हेक्‍टरवरच बाजरीची पेरणी झाली आहे. बाजरीची टक्केवारी ४१ टक्के आहे. तूर, मूग, उडीद यांची पेरणी मात्र सरासरीच्या दुप्पट झाली आहे. 

यंदा तुरीची १८१ टक्के, मुगाची २६१ टक्के, उडीदाची ३४९ टक्‍के पेरणी झाली आहे. सोयाबीनची पेरणीही सरासरीपेक्षा कमी आहे. सोयाबीनचे सरासरी ५८ हजार २८२ हेक्‍टर क्षेत्र आहे. मात्र आतापर्यंत ५३ हजार ६४६ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. कापसाचे सरासरी १ लाख ५ हजार ४२७ हेक्‍टर क्षेत्र आहे. मात्र, आतापर्यंत ८४ टक्के म्हणजे ८८ हजार ५७३ हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली आहे.

जिल्ह्यामध्ये खरिपाची पेरणी, कापूस लागवड झालेली असली तरी अनेक भागात पुरेसा पाऊस नाही. शेतकरी अडचणीत सापडले असून, पावसाची प्रतीक्षेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com