Agriculture news in Marathi Kharif sowing on 92% area in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात शुक्रवार (ता. १०) पर्यंत ६ लाख ८७ हजार ५०९ हेक्टरवर (९२.५५ टक्के) पेरणी झाली आहे. सोयाबीन, तूर या दोन पिकांची सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झाली आहे.कपाशीचे लागवड क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी झाली आहे.या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी माहिती दिली.

नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात शुक्रवार (ता. १०) पर्यंत ६ लाख ८७ हजार ५०९ हेक्टरवर (९२.५५ टक्के) पेरणी झाली आहे. सोयाबीन, तूर या दोन पिकांची सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झाली आहे.कपाशीचे लागवड क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी झाली आहे.या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी माहिती दिली.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४२ हजार ८६१ हेक्टर आहे. त्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९ हजार ३७५ हेक्टर असताना आजवर ३ लाख ३९ हजार ३०२ हेक्टरवर (१०९.३७ टक्के) पेरणी झाली आहे. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार ७८८ हेक्टर असताना ६४ हजार २५६ हेक्टरवर (१०५.७१ टक्के) पेरणी झाली आहे. मात्र, कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ६० हजार ५०५ हेक्टर असताना आजवर २ लाख ६ हजार ८१६ हेक्टरवर (७९.३९ टक्के) लागवड झाली आहे.

तृणधान्य पिकांमध्ये भाताची २२८ हेक्टर (२६.५७ टक्के), ज्वारीची २७ हजार ९३९ हेक्टर (५२.४७ टक्के), बाजरीची २३ हेक्टर (६९.७० टक्के), मक्याची ४७२ हेक्टर (७२.७३ टक्के) पेरणी झाली. कडधान्ये पिकांमध्ये मुगाची २३ हजार ५९० हेक्टर (८७.७२ टक्के), उडदाची २४ हजार १५१ हेक्टर (८४.८२ टक्के) पेरणी झाली. गळितधान्ये पिकांमध्ये तिळाची ३७३ हेक्टर (४६.६८ टक्के), कारळाची २३८ हेक्टर ५०.५३ टक्के) पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात तृणधान्याची एकूण २८ हजार ६९९ हेक्टरवर (५२.१४ टक्के), कडधान्यांची १ लाख ११ हजार ९९७ हेक्टर (९६.१८ टक्के), गळीत धान्याची ३ लाख ३९ हजार ९८७ हेक्टरवर (१०९.३७ टक्के) पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील सोळा पैकी धर्माबाद, देगलूर, कंधार या तीन तालुक्यांत सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त पेरणी झाली आहे. अन्य तालुक्यात ७५.४० ते ९६.७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्के
नांदेड २५७३६ १९४०५ ७५.४०
अर्धापूर १९२७१ १७७९९ ९२.३६
मुदखेड १८८२२ १६२६७ ८६.४३
हदगाव ८०२२३ ७२९७० ९०.९६
माहूर ३३८१६ ३२६९९ ९६.७०
किनवट ७७१५६ ६७४०० ८७.३६
हिमायतनगर ३३७९० २८७८२ ८५.१८
भोकर ४७२६९ ४५२०१ ९५.६३
उमरी ३१७१३ २७५०१ ८६.७२
धर्माबाद २७९८ २८९८७ १०३.६०
नायगाव ४६५४९ ४०५६२ ८७.१४
बिलोली ४४८७१ ४१४४३ ९२.३६
देगलूर ५०४१८ ५४५३० १०८.१६
मुखेड ७५४०९ ६२६६८ ८३.१०
कंधार ६०३४२ ६४९९५ १०७.७१
लोहा ६९४९५ ६६३०० ९५.४०

 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...