Agriculture News in Marathi In kharif sowing area Decrease by 14,000 hectares | Page 4 ||| Agrowon

खरीप पेरणी क्षेत्रात  १४ हजार हेक्टरने घट 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 सप्टेंबर 2021

खरीप हंगामात सुरूवातीच्या काळात कमी झालेल्या पावसाचा परिणाम पेरणीवर झाला आहे. यंदा खरीप पेरणीच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १४ हजार ७५९ हेक्टरने घट झाली आहे.

पुणे : खरीप हंगामात सुरूवातीच्या काळात कमी झालेल्या पावसाचा परिणाम पेरणीवर झाला आहे. यंदा खरीप पेरणीच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १४ हजार ७५९ हेक्टरने घट झाली आहे. त्यातच उशिराने झालेला अतिपाऊस, पावसाचा खंड यामुळे झालेले नुकसानीमुळे उत्पादनात चांगलीच घट येण्याची शक्यता आहे. 

गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात तब्बल दोन लाख १४ हजार ९७२ हेक्टरवर म्हणजेच सरासरी ११७ टक्के पेरणी झाली होती. यंदा जिल्ह्यात खरिपाचे सरासरी १ लाख ८४ हजार २७४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २ लाख २१३ हेक्टर म्हणजेच १०९ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये भाताची ५७ हजार ९६४ हेक्टरपैकी ६० हजार १३७ हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. सरासरी १०४ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. सध्या भात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

पाऊस कमी असल्याने काही ठिकाणी खाचरातील पिकांची वाढ खुटलेली आहे. तसेच शेंडे करपले आहेत. पावसाच्या खंडामुळे पेर भात व पाणी असलेल्या भात क्षेत्रामध्ये २५० हेक्टरवर हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

मुगाचे सरासरी १३ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ११ हजार ४९१ हेक्टर म्हणजेच ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. शिरूर तालुक्यात ९० ते ९५ टक्के काढणी पूर्ण झालेली आहे. येत्या आठवड्यात मुगाची काढणी पूर्ण होईल. उडदाचे सरासरी १५५६ हेक्टर क्षेत्र असून, १३७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सद्यःस्थितीत पिकांची काढणी सुरू आहे. पावसाच्या पडलेल्या खंडामुळे उडीद पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. बाजरी पिकांचे ३८ हजार ७६० हेक्टर क्षेत्र असून, ३७ हजार ६३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. अनेक ठिकाणी पिके निसवण्याच्या व काढणीच्या अवस्थेत आहेत. 

सोयाबीनचे १७ हजार ४८१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ३६ हजार २१६ हेक्टर म्हणजेच २०७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या पीक शेंगा लागणीच्या अवस्थेत असून, दौड, जुन्नर, आंबेगाव, 
इंदापूर व खेड तालुक्यात जवळपास १८१९ हेक्टरवर पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने उत्पादकतेत मोठी घट येण्याची शक्यता आहे.
 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...
खानदेशात पावसाने सोयाबीन, कापसाचे नुकसानजळगाव: खानदेशात अनेक भागात शनिवारी (ता. १६)...
जळगाव : वाघूर प्रकल्पग्रस्तांना...शेंदुर्णी, जि. जळगाव : वाघूर प्रकल्पासाठी २००५...
जालना बांबू लागवडीचे देशातील मोठे...जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद...
सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के... सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...