Agriculture news in Marathi Kharif sowing begins in Nanded | Agrowon

नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून सोयाबीनसह कपाशी, हळद, तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे.

नांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून सोयाबीनसह कपाशी, हळद, तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ९१५ हेक्टरनुसार २०.५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. सोयाबीनची पेरणी यंदा यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने होत आहे.  

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांत १६६.४० मिलिमीटरनुसार २०.४० टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतकरी पेरणींच्या कामांना लागले आहेत. यंदा पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून होता. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मागील पाच ते सहा दिवसांपासून कपाशी लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. यासोबतच जिरायती भागात सोयाबीन, कापूस, ज्वारी यासह आंतरपिके म्हणून तूर, मूग, उडीद, तीळ, कारळ या पिकांचीही लागवड केली जात आहे. यंदा शेतकरी पारंपरिक बैलजोडीच्या साह्याने तिफणीच्या माध्यमातून पेरणी करण्यापेक्षा यांत्रिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. अनेकांनी ट्रॅक्टरच्या साह्याने रुंद वरंबा सरी पद्धतीने (बीबीएफ) पेरणी करण्यावर अधिकचा भर दिला आहे.

चार लाख हेक्टरवर सोयाबीन लागवडीचा अंदाज
जिल्ह्यात यंदा साडेआठ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. यात सोयाबीन चार लाख हेक्टर तर सव्वादोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु यंदा कपाशीच्या लागवडीत घट होऊन सोयाबीनचा पेरा वाढेल, अशी शक्यता कृषी निविष्ठा विक्रेते व्यक्त करीत आहेत. 

पेरणीयोग्य पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. पिकांची उगवणही चांगली होत असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीतून दिसून आले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी शंभर मिलिमीटर पावसानंतरच करावी.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...