बुलडाण्यात खरीप पेरणी  सात लाख हेक्टरवर होणार 

आगामी खरीप हंगामात ७ लाख ३५ हजार हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहेत. हंगामाचे दिवस जवळ येत आहेत. शेतकरी कोरोनाच्या संकटकाळातही शेतीच्या पूर्व मशागतीमध्ये व्यस्त आहे.
बुलडाण्यात खरीप पेरणी  सात लाख हेक्टरवर होणार  Kharif sowing in bulldozers It will be on seven lakh hectares
बुलडाण्यात खरीप पेरणी  सात लाख हेक्टरवर होणार  Kharif sowing in bulldozers It will be on seven lakh hectares

बुलडाणा : आगामी खरीप हंगामात ७ लाख ३५ हजार हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहेत. हंगामाचे दिवस जवळ येत आहेत. शेतकरी कोरोनाच्या संकटकाळातही शेतीच्या पूर्व मशागतीमध्ये व्यस्त आहे. या वर्षी दमदार पावसामुळे रब्बी हंगामात चांगले पीक आले, तसेच अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकेही घेतली. आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यंत्रणांना दिले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. या प्रसंगी ऑनलाइन पद्धतीने खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार राजेश एकडे, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे सहभागी होते. 

या वेळी पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खतांचा पुरवठा व्हावा. यात कुठलीही कमतरता पडू नये. बियाणे निकृष्ट निघाल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाची सरासरी गृहीत धरून आर्थिक मदत देण्यासाठी कंपन्यांकडून लेखी हमीपत्र घ्यावे, अशी सूचना डॉ. शिंगणे यांनी केली. बियाणे निकृष्ट निघाल्यास कंपन्या तुटपुंजी मदत देतात. गुण नियंत्रणा संदर्भात विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना करावी.

या पथकांकडून खते, बियाणे व कीटकनाशक दुकानांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ३० मेपर्यंत ५० टक्के व १५ जूनपर्यंत ८० टक्के कृषी पतपुरवठा पूर्ण करण्यात यावा. बँकांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार पीककर्ज वितरण पूर्ण करावे. त्यासाठी सातत्याने आढावा घ्यावा, असे निर्देशही दिले. आरोग्य पत्रिकेनुसार शेतकऱ्यांनी खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा उपयोग करण्यासाठी कृषी सेवक, कृषी सहायक माफत गावातील शेतकरी दत्तक घेण्यात यावे. 

यंदा ७ लाख ३५ हजार हेक्टरवर नियोजन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी बैठकीत माहिती देताना म्हणाले, ‘‘खरिपात जिल्ह्यात सोयाबीन ३ लाख ८५ हजार हेक्टर, कापूस १ लाख ९८ हजार हेक्टर, तूर ७४ हजार हेक्टर, उडीद २० हजार हेक्टर, मका २८ हजार, ज्वारी १० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे. अशाप्रकारे एकूण खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लक्ष ३५ हजार ४०० हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. जिल्ह्यासाठी १ लाख ६५ हजार १६० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. आजरोजी प्रत्यक्ष पुरवठा ७५ हजार ४४६ मेट्रिक टन आहे. उर्वरित जुलैपर्यंत पूर्ण मिळणार आहे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com