मराठवाड्यात खरिपाची ४८ लाख हेक्टरवर पेरणी

मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाच्या सर्वसाधारण ४८ लाख १६ हजार ९६८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४७ लाख ७३ हजार ४९२ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली.
sowing
sowing

औरंगाबाद: मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाच्या सर्वसाधारण ४८ लाख १६ हजार ९६८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४७ लाख ७३ हजार ४९२ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. सर्वाधिक २० लाख ६६ हजार ९०२ हेक्‍टरवर सोयाबीन तर १४ लाख ५७ हजार ७९४ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यंदा कपाशीची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९ टक्के कमी लागवड झाली आहे. यंदा मराठवाड्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. बियाणे उगवणीचा प्रश्न निर्माण झाला असला तरी सर्वसाधारण १६ लाख ६३ हजार चौदा हेक्टरच्या तुलनेत तब्बल २० लाख ६६ हजार ९०२ हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यंदा कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्‍टर असताना प्रत्यक्षात मात्र ९ टक्के कमी म्हणजेच१४ लाख ५७ हजार ७९४ हेक्‍टरवर लागवड झाली. इतर प्रमुख पिकांमध्ये खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८ हजार ६३६ हेक्‍टर असताना प्रत्यक्षात केवळ ३६ टक्के अर्थात ७७ हजार १२८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.  बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४३ हजार २३३ हेक्‍टर असताना १ लाख ८ हजार ८९० हेक्टरवर बाजरीची तर सर्वसाधारण २ लाख ७३ हजार ७२२ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ३६ हजार २३८ हेक्‍टरवर मक्याची पेरणी झाली आहे. तुरीच्या ४ लाख ९७ हजार ६०१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४ लाख ५९ हजार ७६६ हेक्‍टरवर तूर, मुगाच्या  १ लाख १६ हजार ७ हेक्टरच्या तुलनेत १ लाख ४६ हजार ५७७ हेक्टरवर तर उडदाच्या १ लाख ५८ हजार २६८ च्या तुलनेत १ लाख ४६ हजार ५४९ हेक्‍टरवर उडदाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मराठवाड्यातील जिल्हानिहाय पेरणी (लाख हेक्टरमध्ये)

जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र  पेरणी
औरंगाबाद  ६.७५  ६.५२
जालना  ६.१   ५.९१ 
बीड ७.४६ ७.४९ 
लातूर  ६.२२ ६.१
उस्मानाबाद   ४.९७   ५.३२ 
नांदेड   ७.४२      ७.५५
परभणी   ५.१७   ४.८२
हिंगोली  ४.२४  ४.९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com