agriculture news in Marathi Kharif sowing over average area Maharashtra | Agrowon

खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढे

कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

खरिपाचे सरासरी क्षेत्र १० लाख ६६ हजार हेक्टर असून गुरुवारपर्यंत (ता.१०) देशात ११ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

नवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने खरिपाचा पेरा सरासरी लागवड क्षेत्रापेक्षाही अधिक झाला आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र १० लाख ६६ हजार हेक्टर असून गुरुवारपर्यंत (ता.१०) देशात ११ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. तर, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ६ टक्के अधिक पेरा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून मिळाली. 

देशात यंदा जून महिन्यात मॉन्सूनचा पाऊस चांगला झाला. पेरणीयोग्य वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकत्या घेतल्या. महत्त्वाच्या खरीप उत्पादक राज्यांत पावसाने यंदा सुरुवातीपासून चांगली हजेरी लावली. त्यामुळे या राज्यांमध्ये पेरण्या लवकर उरकल्या, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञांनी दिली. खरिपातील बहुतेक पिके ही मॉन्सूनच्या पाण्यावरच अवलंबून असतात. त्यामुळे देशात जसाजसा मॉन्सून बरसत गेला, तसतशा पेरण्याही होत गेल्या. पाऊस चांगला झाल्याने यंदा सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन लागवड झाली आहे.  

देशात यंदा भरडधान्य पिकांची पेरणीतही यंदा १.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १७७ लाख हेक्टरवर भरडधान्य पिके होती. यंदा आत्तापर्यंत १८० लाख हेक्टरवर या पिकांचा पेरा झाला आहे. कापसाच्या लागवडीतही दोन टक्क्यांनी वाढ झाली असून आत्तापर्यंत १२९ लाख ३० हजार हेक्टरवर कापूस आहे. गेल्यावर्षी १२६ लाख ६१ हजार हेक्टरवर कापसाचे पीक होते. तर, सरासरी क्षेत्र १२० लाख ९७ हजार हेक्टर आहे. ऊस लागवडीतही क्वचित वाढ झाली असून ५२ लाख ४६ हजार हेक्टरवर ऊस आहे. गेल्यावर्षी ५१ लाख ७५ हजार हेक्टरवर उसाचे पीक होते.

भात लागवडीत वाढ
खरिपातील महत्त्वाचे पीक असलेल्या भाताची यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त लागवड झाली आहे. तसेच सरासरी क्षेत्रापेक्षाही अधिक लागवड यंदा झाली. गेल्यावर्षी भाताची ३७४ लाख हेक्टरवर भाताचे पीक होते. तर, आत्तापर्यंत ४०२ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. भात उत्पादक पट्ट्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. परिणामी यंदा भात लागवड वाढली आहे.

कडधान्याच्या पेरणी ५ टक्क्यांनी अधिक
कडधान्य लागवडही यंदा ५ टक्क्यांनी वाढली आहे. देशातील कडधान्याचे सरासरी क्षेत्र १२८ लाख ८८ हजार हेक्टर आहे. तर मागील वर्षी १३१ लाख ७६ हजार हेक्टरवर कडधान्य पिकांची लागवड झाली होती. यंदा गेल्यावर्षीपेक्षा आणि सरासरी क्षेत्रापेक्षाही ५ टक्के अधिक लागवड झाली आहे. आत्तापर्यंत कडधान्य पिकांची १३७ लाख ८७ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.

तेलबिया पिकांच्या पेरणीत सर्वाधिक १०.८ टक्के वाढ
केंद्र सरकारने तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ करून तसेच इतर मार्गांनी शेतकऱ्यांना तेलबिया लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आहे. परिणामी तेलबिया पिकांची लागवड यंदा १०.८ टक्क्यांनी वाढली आहे. देशात तेलबिया पिकांचे सरासरी क्षेत्र १७८ लाख ८ हजार हेक्टर आहे. तर, मागील वर्षी खरिपात १७६ लाख ९१ हजार हेक्टरवर तेलबिया पिकांचा पेरा झाला आहे.


इतर अॅग्रोमनी
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दराचा...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या पंधरा...
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...
‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर...नाशिक : भारतीय शेतीमाल व खाद्यपदार्थांना जगभर...
ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन...सध्या शेतकरी कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर करार...
जळगावच्या सुवर्ण बाजाराला झळाळीजळगाव ः शुद्धता, सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
सोयाबीनची चाल पाच हजारांकडे  पुणे ः देशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड...
बेदाणा दरात सुधारणासांगली ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून...
नाईक सूतगिरणीचा कंटेनर निघाला चीन,...पुसद, जि. यवतमाळ : लॉकडाउन काळात पिंपळगाव कान्हा...
बांगलादेशच्या वस्त्रोद्योगात चीनची मोठी...जळगाव ः भारतीय कापसाचा सर्वांत मोठा खरेदीदार...
साखर निर्यात यंदा ठरणार फायदेशीरकोल्हापूर : साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या...
सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटलीसांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...