Agriculture news in marathi Kharif sowing proposed in 5 districts of Latur agriculture department on 29 lakh 41 thousand hectares | Page 3 ||| Agrowon

लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत खरीप पेरणी २९ लाख ४१ हजार हेक्‍टरवर प्रस्तावित

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

लातूर : लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामासाठी २९ लाख ४१ हजार १७६ हेक्टरवर खरिपाचे क्षेत्र प्रस्तावित आहे.

लातूर : लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामासाठी २९ लाख ४१ हजार १७६ हेक्टरवर खरिपाचे क्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये १७ लाख २८ हजार हेक्टरवरील सोयाबीन, तर १२ लाख १२ हजार ८९२ हेक्टरवरील इतर खरीप पिकांच्या प्रस्तावित क्षेत्राचा समावेश आहे.

लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांत गत तीन वर्षांतील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १६ लाख ३२ हजार ५८८ हेक्टर आहे. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील ४ लाख २७ हजार ४३७ हेक्टर, उस्मानाबाद ३ लाख ३४ हजार १४२ हेक्टर, नांदेड ३ लाख ७८ हजार ९३५ हेक्टर, परभणी २ लाख ४१ हजार ८०३ हेक्टर, तर हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ५० हजार २७१ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

सर्वसाधारण क्षेत्रासाठी सरासरी ४ लाख २३ हजार ३०५ क्विंटल बियाण्याची विक्री केली जाते. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत येत्या खरीप हंगामासाठी विभागात सोयाबीनचे १७ लाख २८ हजार २८४ हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील ४ लाख ५० हजार, उस्मानाबाद ३ लाख ७४ हजार ६०७, नांदेड ४ लाख, परभणी २ लाख ४० हजार तर हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ६३ हजार ६७७ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. 

पेरणीसाी १२ लाख ९६ हजार २१३ क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज असेल. ३५ टक्के बियाणे बदल दरानुसार ४ लाख ५३ हजार ६७५ क्विंटल बियाणे लागतील. खरीप २०२० मधील ग्राम बीजोत्पादन मोहिमेद्वारे तसेच शेतकऱ्यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले बियाणे मिळून स्थानिक पातळीवर एकूण उपलब्धतेत १२ लाख ६६ हजार ४३१ क्विंटल बियाण्यांचा समावेश असेल. इतर स्रोतांमधून २९ हजार ४८२ क्विंटल बियाण्याची आवश्यकता राहील.

विभागासाठी १ लाख ४२ हजार ८४४ क्विंटल सोयाबीन बियाणे महाबीजकडून, २० हजार ९०० क्विंटल बियाणे राबिनीकडून, तर २ लाख ८२ हजार ५५ क्विंटल बियाणे खासगी कंपन्यांकडून असे एकूण चार लाख ४५ हजार ७९९ क्विंटल बियाणे मिळणे अपेक्षित आहे. 


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...