पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख हेक्टरने वाढ

यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. शेतकऱ्यांना वेळेवर पेरण्यास करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खरीप पेरणीच्या क्षेत्रात तब्बल २ लाख ६२ हजार १०३ हेक्टरने वाढ झाली आहे.
Kharif sowing in Pune division increased by 2.5 lakh hectares
Kharif sowing in Pune division increased by 2.5 lakh hectares

पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. शेतकऱ्यांना वेळेवर पेरण्यास करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खरीप पेरणीच्या क्षेत्रात तब्बल २ लाख ६२ हजार १०३ हेक्टरने वाढ झाली आहे. खरिपाच्या सरासरीच्या ८ लाख ६६ हजार ८१९ हेक्टरपैकी ११ लाख २८ हजार ९२२ हेक्टर म्हणजेच १३० टक्के पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार पुणे विभागात जून महिन्यात सरासरीच्या १२६.८ मिलिमीटरपैकी १८३.९ मिलिमीटर पाऊस पडला. यामध्ये नगरमध्ये सर्वाधिक सरासरीच्या १०९.३ मिलिमीटरपैकी २१४.५ मिलिमीटर पाऊस पडला. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण असले तरी पावसाने जवळपास सरासरी गाठली आहे. सरासरीच्या १५९.३ मिलिमीटरपैकी १६६.५ मिलिमीटर पाऊस पडला. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस पडल्याचे दिसून आले. नगरमध्ये ९६.० मिलिमीटरपैकी १९४.२ मिलिमीटर पाऊस पडला. आॅगस्टमध्ये एक ते सहापर्यंत १३९ मिलिमीटरपैकी ३९.३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामध्ये नगर २५.८, पुणे ८१.९ आणि सोलापूरमध्ये १०.२ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

नगरमध्ये खरीप हंगामातील बाजरी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पिकांमध्ये आंतरमशागतीचे कामे चालू आहे. काही ठिकाणी पोटरीच्या व फुलोऱ्याच्या तसेच निसवण्याच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती समाधानकारक आहे. भाताची पुर्नलागवडीची कामे चालू असून भात पीक घेत असलेल्या महसूल मंडळामध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने भाताची पुर्नलागवड खोळंबली आहे. सद्यःस्थितीत भात पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे.

मका पीक वाढीच्या अवस्थेत असून आंतरमशागतीची कामे चालू आहेत. मका पिकांवर काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मूग पिकांवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. कापूस पीक पाते लागणे ते फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. काही प्रमाणात पिवळे पडले असून काही ठिकाणी कापूस पिकांवर मावा तुडतुड्याच्या प्रादुर्भाव दिसून आला आहे.

पुणे जिल्ह्यात भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यात पश्चिम भागात सुमारे ३० हजार ६१९ हेक्टरवर भाताची पुर्नलागवड झाली आहे. सोयाबीन, बाजरी पिके वाढीच्या तर मूग पीक फुलोऱ्यांच्या अवस्थेत आहे. इंदापूर, पुरंदर, दौंड व खेड तालुक्यात मका पिकांवर लष्करी अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोलापूरमध्ये तूर पीक फांद्या फुटण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

उडीद, मूग पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पिकांची पाने पिवळी पडल्याचे दिसून येत आहे.

जिल्हानिहाय झालेली खरीप पेरणी (हेक्टरमध्ये)
जिल्हा  सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी
नगर ४,४७,९०४ ५,९७,८९१ १३३
पुणे १,८४,२७४ १,६४,९२१ ८९
सोलापूर २,३४,६४१ ३,६६,११० १५६
एकूण ८,६६,८१९ ११,२८,९२२ १३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com