Agriculture news in Marathi, Kharif sowing remains unavoidable due to lack of rainfall | Agrowon

पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 जून 2019

पुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. यामुळे पुणे विभागात खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या आठवड्यात पाऊस न झाल्यास पेरणीच्या क्षेत्रात घट होऊन शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

पुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. यामुळे पुणे विभागात खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या आठवड्यात पाऊस न झाल्यास पेरणीच्या क्षेत्रात घट होऊन शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

मागील आठवड्यात पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पूर्वमोसमी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात खरीपाची तयारी सुरू केली होती. अनेक भागात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेत नांगरणी व वखरणी करून ठेवले आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीचे कामे थांबल्याची स्थिती आहे.  

पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव, तर नगर जिल्हातील अकोले तालुक्यात प्रामुख्याने भाताची लागवड केली जाते. त्यासाठी कृषी विभागाकडून बियाणांचा पुरवठा कृषी विभागाने केला आहे. भात लागवडीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका तयार होतात. यंदाही मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका मोठ्या प्रमाणात होणार असल्याची शक्यता आहे. मात्र, जूनचे महिन्याचे पंधरा दिवस ओलांडले तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या पाच ते सहा दिवसापासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत असले तरी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय रोपवाटिकेची कामे हातात घ्यायला नको, अशा मनस्थितीत शेतकरी आहेत. 

उर्वरित सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यातील भात पट्यातील तालुके वगळता शेतकऱ्यांनी चांगला पाऊस होईल या अपेक्षेने खते, बियाणांची खरेदी सुरू केली असल्याचे दिसून येते. मात्र, पावसाने अजूनही हजेरी न लावल्याने खते, बियाणे तसेच पडून असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी एक ते वीस जून या काळात नगर जिल्ह्यात ४४.३ मिलिमीटर, पुणे जिल्ह्यामध्ये ६६.५ मिलिमीटर तर सोलापूर जिल्ह्यात ४३.० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे याच काळात सरासरीच्या सात लाख ८८ हजार ४८० हेक्टरपैकी ९ हजार ११० हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, चालू वर्षी काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी खरिपाच्या पेरण्या अजूनही झालेल्या नाहीत.

पुणे विभागातील खरिपाचे पीकनिहाय सरासरी क्षेत्र, हेक्टरमध्ये 
भात ८१,३९०, खरीप ज्वारी ७,४५०, बाजरी २,३६,२५०, रागी १३,६८०, मका ७८,४६०, इतर खरीप तृणधान्ये १८,३३०, तूर ३९,६३०, मूग १८,९६०, उडीद १६,१२०, इतर खरीप कडधान्ये ३१,२६०, भूईमूग ४७,८४०, तीळ २५८०, कारळे ६१८०, सुर्यफूल ९१९०, सोयाबीन ६८९३०, इतर तेलबिया ५८१०

इतर ताज्या घडामोडी
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...