Agriculture news in Marathi Kharif sowing in the state is three per cent | Page 2 ||| Agrowon

राज्यात खरीप पेरणी तीन टक्के

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 जून 2021

राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या तुलनेत तीन टक्के पेरणी झाली आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरण्यांना फारसा वेग येताना दिसत नाही. कापसाची लागवड सहा टक्के झाली आहे.

नगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या तुलनेत तीन टक्के पेरणी झाली आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरण्यांना फारसा वेग येताना दिसत नाही. कापसाची लागवड सहा टक्के झाली आहे. तर सोयाबीनची पेरणी ही अल्पच आहे. यंदा आतापर्यंत ४ लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी झालीय. तर गेल्या वर्षी आतापर्यंत ७ लाख ५३ हजार २१६ हेक्टरवर पेरणी, कापूस लागवड झाली होती.

राज्यात खरिपाची पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज आहेत. सुरुवातीला बहुतांश भागांत पूर्वमोसमी पाऊस झाला. मात्र मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाने उसंत दिली. काही भागांत अधून-मधून पाऊस पडत असला तरी अपवाद सोडला, तर बहुतांश भागात पेरणीलायक पाऊस झालेला नाही. त्यात कृषी विभागानेही किमान ९० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी, कापूस लागवड करू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या, कापूस लागवड आठ दिवसांपासून थांबल्यासारखी झाली आहे. 

राज्यात खरिपाचे सरासरी १ कोटी ४१ लाख ९७ हजार ६२५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक कापसाचे ४१ लाख ८३ हजार ८०१ हेक्टर, तर त्यापोठापाठ सोयाबीनचे ३८ लाख ८४ हजार ६३३ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या १५ जूनपर्यंत ७ लाख ५३ हजार हेक्टरवर पेरणी, कापूस लागवड झाली होती. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ३ लाख २० हजार हेक्टर कमी क्षेत्रावर पेरणी झालीय. आतापर्यंत कपाशीची सर्वाधिक ६ टक्के लागवड झाली असून, सोयाबीनसह पिकांची पेरणी २ ते ३ टक्केच आहे. औरंगाबाद, नाशिक विभागांत कपाशीची सर्वाधिक, तर कोल्हापूर विभागात तृणधान्याची सर्वाधिक पेरणी झाली आहे. अन्नधान्याची औरंगाबाद विभागात पेरणी झालीय. गळीतधान्याची औरंगाबाद, कोल्‍हापूर विभागांत अधिक पेरणी झाली आहे.

पेरणी झालेले क्षेत्र (कंसात सरासरी क्षेत्र)
बाजरी ७०२२ (६,७१,५९५)
भात ३५,१९६ (१४,९७,४४९)
खरीप ज्वारी ८१६ (४,८२,४६१)
रागी ६७३ (९४,७३१)
मका ६०९८ (८,३८,०६०)
तूर २६५७९ (१२,७५,९७१)
मूग ५६२० (४८३३४७)
उडीद ३५८९५३ (६०६५)
भुईमूग ६९९८ (१९८४३५)
तीळ ० (२३,६७२)
कारळे ५ (१९७२७)
सूर्यफूल ६ (१७९६५)
सोयाबीन ४९,९८४ (३८,८४,६३३)
कापूस २,६९,६४० (४१८३८०१)

खरिपात पारंपरिक पद्धतीशिवाय नवी पेरणी, लागवड पद्धत वापरण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न आहेत. मात्र किमान ९० मिलिमीटर पाऊस असल्याशिवाय पेरणी करू नये, असे शेतकऱ्यांना आवाहन आहे. आता पाऊस काहीसा थांबला असल्याने पेरण्याही थांबल्या आहेत. मूग, उडदावर अन्य पिकांची पेरणी करण्यासाठी अजून अवधी आहे.
- विलासराव नलगे, 
कृषी उपसंचालक, नगर


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...