नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली 

नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत ११६ टक्के म्हणजे ५ लाख २२ हजार ३०८ हेक्टरवर पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे.
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली  Kharif sowing in the town exceeded the average
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली  Kharif sowing in the town exceeded the average

नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत ११६ टक्के म्हणजे ५ लाख २२ हजार ३०८ हेक्टरवर पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे. बाजरीच्या क्षेत्रात कमालीची घट झाली असून, कापसाचे क्षेत्रही यंदा साधारण बारा हजार हेक्टरने घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरिपातील बहुतांश पिकांच्या पेरणीचा कालावधी आता संपला आहे.  नगर जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मध्यंतरी वीस ते पंचवीस दिवस पावसाने दडी मारली असल्याने खरिपाच्या पेरण्यांवर परिणाम झाला. पेरण्या रखडल्याने शेतकरी हवालदिल होते. त्यात कृषी विभागानेही ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असा सल्ला दिला होता. गायब झालेला पाऊस आठ दिवसांपासून सुरू झाला आहे. राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडत असला, तरी नगर जिल्ह्यातील अकोल तालुका वगळता अन्य भागात फारसा जोरदार नाही. मात्र झालेल्या पावसावरच गेल्या आठ दिवसात बहुतांश पेरण्या उरकल्या आहेत. त्यात सतत पाऊस पडत असल्याने पिकांनीही बहर धरला आहे.  वेळेत पाऊस आला नसल्याचा वाईट परिणाम कापूस, बाजरीच्या क्षेत्रावर परिणाम झाला आहे. बाजरीचे क्षेत्र चाळीस टक्क्यांनी तर कापसाचे क्षेत्र बारा टक्क्यांनी कमी झाल्यात जमा आहे. यंदा उडदाचे सर्वाधिक क्षेत्र वाढले आहे. सरासरीच्या तुलनेत उडदाची ४१२ टक्के, तुरीची ३२४ टक्के, मक्याची १५४ टक्के, मुगाची ११८ टक्के पेरणी झाली आहे. यंदा सोयाबीनही सरासरीच्या १८३ टक्के पेरले गेले आहे. कापसाची सरासरीच्या ८८.६२ टक्के पेरणी झाली आहे. अकोले तालुक्यात भात लागवडीलाही अजून फारसा वेग येईना.  पेरणी झालेले हेक्टर क्षेत्र (कंसात सरासरी)  भात ः २,१०६ (१४,०३६), खरीप ज्वारी ः १४ (१,६६६), बाजरी ः ८५,३८३ (१,४०,८९२), रागी-नागली ः २१४ (८८९), मका ः ५०,२६२ (३२,५७१), तूर ः ४९,१३९ (१५,१२१), मुग ः ४७,९२२ (४०,३७८), उडीद ः ७२,५५२ (१७,५९६), भुईमूग ः ५,८९३ (७.४३०), तीळ ः १०८ (१००), कारळे ः १८० (८७५), सूर्यफूल ः ९१ (५३४), सोयाबीन ः ९९,४२७ (५४,२९४), कापूस ः १,०१,३४० (१,१४,३५२). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com