Agriculture news in marathi Kharif sowing in the town exceeded the average | Agrowon

नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत ११६ टक्के म्हणजे ५ लाख २२ हजार ३०८ हेक्टरवर पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे.

नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत ११६ टक्के म्हणजे ५ लाख २२ हजार ३०८ हेक्टरवर पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे. बाजरीच्या क्षेत्रात कमालीची घट झाली असून, कापसाचे क्षेत्रही यंदा साधारण बारा हजार हेक्टरने घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरिपातील बहुतांश पिकांच्या पेरणीचा कालावधी आता संपला आहे. 

नगर जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मध्यंतरी वीस ते पंचवीस दिवस पावसाने दडी मारली असल्याने खरिपाच्या पेरण्यांवर परिणाम झाला. पेरण्या रखडल्याने शेतकरी हवालदिल होते. त्यात कृषी विभागानेही ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असा सल्ला दिला होता. गायब झालेला पाऊस आठ दिवसांपासून सुरू झाला आहे.

राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडत असला, तरी नगर जिल्ह्यातील अकोल तालुका वगळता अन्य भागात फारसा जोरदार नाही. मात्र झालेल्या पावसावरच गेल्या आठ दिवसात बहुतांश पेरण्या उरकल्या आहेत. त्यात सतत पाऊस पडत असल्याने पिकांनीही बहर धरला आहे. 

वेळेत पाऊस आला नसल्याचा वाईट परिणाम कापूस, बाजरीच्या क्षेत्रावर परिणाम झाला आहे. बाजरीचे क्षेत्र चाळीस टक्क्यांनी तर कापसाचे क्षेत्र बारा टक्क्यांनी कमी झाल्यात जमा आहे. यंदा उडदाचे सर्वाधिक क्षेत्र वाढले आहे. सरासरीच्या तुलनेत उडदाची ४१२ टक्के, तुरीची ३२४ टक्के, मक्याची १५४ टक्के, मुगाची ११८ टक्के पेरणी झाली आहे. यंदा सोयाबीनही सरासरीच्या १८३ टक्के पेरले गेले आहे. कापसाची सरासरीच्या ८८.६२ टक्के पेरणी झाली आहे. अकोले तालुक्यात भात लागवडीलाही अजून फारसा वेग येईना. 

पेरणी झालेले हेक्टर क्षेत्र (कंसात सरासरी) 
भात ः २,१०६ (१४,०३६), खरीप ज्वारी ः १४ (१,६६६), बाजरी ः ८५,३८३ (१,४०,८९२), रागी-नागली ः २१४ (८८९), मका ः ५०,२६२ (३२,५७१), तूर ः ४९,१३९ (१५,१२१), मुग ः ४७,९२२ (४०,३७८), उडीद ः ७२,५५२ (१७,५९६), भुईमूग ः ५,८९३ (७.४३०), तीळ ः १०८ (१००), कारळे ः १८० (८७५), सूर्यफूल ः ९१ (५३४), सोयाबीन ः ९९,४२७ (५४,२९४), कापूस ः १,०१,३४० (१,१४,३५२). 


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...