agriculture news in marathi Kharif sowing will be done on four lakh hectares in Wardha district | Page 2 ||| Agrowon

वर्धा जिल्ह्यात चार लाख हेक्‍टरवर होणार खरीप पेरणी

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

वर्धा : जिल्ह्यात खरिप लागवडीखालील या वर्षी ४ लाख ३३ हजार ८५० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होण्याचा अंदाज आहे. 
 

वर्धा : जिल्ह्यात खरिपाची लगबग वाढीस लागली आहे.  यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत काही अंशी लागवडीखालील क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गेल्यावर्षी चार लाख २८ हजार ६१५ तर या वर्षी ४ लाख ३३ हजार ८५० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होण्याचा अंदाज आहे. 

पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे या वर्षीच्या हंगामात मशागतीची कामे महागली आहेत. यामुळे प्रत्येक पिकाचा उत्पादन खर्च वाढीस लागणार आहे. याच्या परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात सदोष बियाण्यांमुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते.

शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतर देखील हंगामाच्या अखेरीस आलेल्या संततधार पावसाने अपेक्षित उत्पादकतेचा पल्ला गाठता आला नाही. परिणामी या वर्षी कृषी विभागाने सोयाबीन उत्पादकांना घरचेच बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे.  त्याकरिता व्यापक जनजागृती जिल्हाभरात केली जात आहे. खताची टंचाई भासू नये याकरिता कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे. 

या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच खतांचे दर वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे. सोयाबीन बियाण्यांच्या किमती देखील या हंगामात वाढणार अशी चर्चा आहे. परिणामी सोयाबीनचा उत्पादन खर्च गेल्या वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत या वर्षी वाढणार असल्याचे संकेत आहेत. असे असले तरी हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला गती दिली आहे. 

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)

 • कापूस : २२६२५०
 • सोयाबीन : १२७५००
 • तूर : ७३५५०
 • मूग : ४८५
 • उडीद : ७१०
 • मका  : १८३५
 • ज्वारी : १८१५

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)

 • आर्वी : ४७०४५
 • आष्टी : २६६२५
 • देवळी : ५६०८०
 • हिंगणघाट : ७३८०५
 • कारंजा : ४८६००
 • समुद्रपूर : ७९१४०
 • सेलू : ४५४२५
 • वर्धा :  ५७१३०
 • एकूण  : ४३३८५०

इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...