Agriculture news in marathi Of kharif in the state Sowing at 83% | Agrowon

राज्यात खरिपाच्या पेरण्या ८३ टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

कोकणाच्या काही भागांत अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेले आहे. कोकणात गेल्या २४ तासांत १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पुणे  : कोकणाच्या काही भागांत अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेले आहे. कोकणात गेल्या २४ तासांत १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात १ जून  ते १९ जुलैपर्यंत सरासरी ४१० मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्ष पाऊस ४८८ मिमी पाऊस झालेला आहे. म्हणजेच ११९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अर्थात, नाशिक (७७ टक्के) व पुणे (८५ टक्के) विभागात अद्यापही कमी पाऊस आहे. 

कृषी खात्याच्या म्हणण्यानुसार, सध्या सुरू असलेला पाऊस एकूण हंगामासाठी दिलासादायक ठरतो आहे.  यामुळे काही भागांत रखडलेल्या पेरण्या आटोपतील. खरिपाचा अजूनही २० टक्के पेरा बाकी आहे. दमदार पावसामुळे भाताच्या पुनर्लागणीची कामे वेगाने पुढे सरकतील. राज्यात भाताखाली सरासरी १५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. मात्र लागण साडेपाच लाख हेक्टरपर्यंत झालेली आहे. म्हणजेच अजून ७० टक्के लागण बाकी असल्यामुळे भातासाठी भरपूर पावसाची गरज आहे. भातपट्ट्यात अनेक ठिकाणी अद्याप लागवड सुरू आहे.

ज्वारी, बाजरीची जागा घेतली सोयाबीनने
राज्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असताना त्या बदल्यात काही भागांमध्ये कपाशीचा पेरा घटतो आहे. मात्र मराठवाड्यातील पारंपरिक खरीप ज्वारी व बाजरीचे क्षेत्र यंदा घटण्याची चिन्हे आहेत. या दोन्ही पिकांची जागा काही गावांमध्ये हळूहळू सोयाबीन घेऊ पाहत असल्याचे दिसून येते,’’ असे निरीक्षण राज्याच्या कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी नोंदविले.  पाटील म्हणाले, ‘‘राज्याचा खरीप पेरा आता अंतिम टप्प्यात आले. येत्या दहा दिवसांत राज्यभर धानाची पुनर्लागण संपुष्टात येईल.

सर्वत्र पाऊस चांगला असल्यामुळे सध्या तरी हंगामाची स्थिती चांगली दिसते आहे. सोयाबीनला गेल्या हंगामात चांगला दर मिळाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनवर जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यामुळे इतर कोणत्याही पिकापेक्षा यंदा सोयाबीनचा सर्वाधिक पेरा राज्यात राहील.


इतर अॅग्रो विशेष
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...