agriculture news in marathi, Kharif's chemical fertilizer stuck | Agrowon

जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडला
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा पुरवठा सुरू असून, मे महिन्याचा लक्ष्यांक व्यवस्थित पूर्ण होईल. कारण, आणखी ११ दिवस हा महिना संपण्यास अवधी आहे. तोपर्यंत अनेक खत कंपन्यांकडून पुरवठा होईल. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

जळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा जिल्ह्यात रखडत सुरू आहे. त्यासंबंधीची गती वाढविण्याबाबत कृषी यंत्रणा पावले उचलणार असल्याची माहिती मिळाली. 

जिल्ह्यात खरिपात सप्टेंबरअखेरपर्यंत तीन लाख ४० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचा पुरवठा होणार आहे. हा पुरवठा एप्रिलपासून सुरू झाला. एप्रिल व मे महिन्यात मिळून ८८ हजार ४२४ मेट्रिक टन खतांचा पुरवठा अपेक्षित आहे. आतापर्यंत ४९ हजार ६०४ मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला आहे. हा पुरवठा रखडत सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर कृषी यंत्रणांनी कंपन्यांशी चर्चा सुरू केली. यात ज्या खतांची विक्री होईल, त्यावरच कंपन्यांना अनुदान मिळत असल्याने हा पुरवठा कंपन्यांकडून रखडत सुरू असल्याचे समोर आले. 

कंपन्यांच्या स्तरावर सहा हजार ४३८ मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे. विक्रेत्यांकडेदेखील मोठ्या प्रमाणात युरिया शिल्लक आहे. हा साठा सुमारे १५ हजार टनांवर असल्याचा दावा कृषी विभागाने केला. 

पावसाळ्यासंबंधी अजून संकेत मिळालेले नाहीत. परंतु जिल्ह्यात युरियासह सरळ खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावीत, यासाठी कंपन्यांशी पत्रव्यवहार झाला आहे. फॉस्फेट, पोटॅशची उपलब्धता सध्या मुबलक आहे.

जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा भागांत खतांची मागणी आहे. या भागातही पोटॅश व इतर संयुक्त खतांचा उठाव आहे. इतरत्र फारशी उचल सुरू नाही. यामुळे खतांची मोठी टंचाई नसल्याचेही सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...