नाशिक जिल्ह्यात खरिपाचे १२८५ कोटींचे कर्जवाटप

नाशिक जिल्ह्यात खरिपाचे १२८५ कोटींचे कर्जवाटप
नाशिक जिल्ह्यात खरिपाचे १२८५ कोटींचे कर्जवाटप

नाशिक : खरीप हंगातील पीककर्ज देण्यासाठी सप्टेंबरअखेर मुदत आहे. तरीही त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बँकांनी दिलेल्या लक्षांकापैकी जुलै अखेरपर्यंत ४८.९७ टक्के कर्ज  वाटप केले. गेल्या आठ दिवसांत ते आणखी तीन टक्यांनी वाढून पीककर्जाचा पुरवठा ५० टक्केपेक्षा जास्त झाला आहे.

जिल्ह्यीतील राष्ट्रीयीकृत, खासगी व जिल्हा बँकेला खरीप कर्जाचे २ हजार ६२५ कोटींचा लक्षांक दिला होते. त्यापैकी १ हजार २८५ कोटी रुपयाचे कर्ज ५६ हजार १५७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन. बी. यांनी हे कर्जवाटप जलदगतीने व्हावे यासाठी बैठका घेतल्या. त्यानंतर हा आकडा ५० टक्क्यांहून अधिक झाला आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या २१ अाहेत. त्यातील दोन बँकांनी, तर खासगी बँकांमधील १७ पैकी ९ बँकांनी कर्जवाटप केलेले नाही.  राष्ट्रीयीकृत बँकांना १८५९ कोटींचा लक्षांक होता. त्यापैकी या बँकांनी ३३ हजार ४७ शेतकऱ्यांना ९०६ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. त्याची टक्केवारी ४८.७३ आहे. तसेच खासगी बँकांनी ४ हजार १७२ शेतकऱ्यांना १०५ कोटी कर्ज दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने १८ हजार ७७७ शेतकऱ्यांना २७२ कोटींचे कर्ज दिले आहे. बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, आयडीबीआय बँक यांसारख्या १९ बँकांनी कर्ज दिले आहे.

नागपूरमध्ये नकार; नाशिकमध्ये होकार येस बँकेने नागपूरमध्ये पीककर्ज देण्यास नकार दिला. मात्र, नाशिकमध्ये लक्षांकापेक्षा ३५ टक्के जास्त कर्ज दिले आहे. या बँकेचा लक्षांक ५ कोटी ५९ लाख असून २५१ शेतकऱ्यांना ७ कोटी ५६ लाखांचे कर्ज दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com