agriculture news in marathi, kharip area increased by 7.5 lac heacters, Maharashtra | Agrowon

खरिपाचा पेरा साडेसात लाख हेक्टरने वाढला
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 16 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली  : यंदाच्या खरिपात सुरवातीच्या टप्प्यात रखडलेल्या पेरण्यांनी आॅगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे वेग घेतला. यंदा मागील खरिपाच्या तुलनेत साडेसात लाख हेक्टरवर अधिक पेरा झाला आहे. आतापर्यंत देशात १० कोटी ५३ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. मागील खरिपाच्या तुलनेत यंदा ०.७ टक्के अधीक पेरणी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालायने जाहीर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली  : यंदाच्या खरिपात सुरवातीच्या टप्प्यात रखडलेल्या पेरण्यांनी आॅगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे वेग घेतला. यंदा मागील खरिपाच्या तुलनेत साडेसात लाख हेक्टरवर अधिक पेरा झाला आहे. आतापर्यंत देशात १० कोटी ५३ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. मागील खरिपाच्या तुलनेत यंदा ०.७ टक्के अधीक पेरणी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालायने जाहीर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. 

देशात यंदा खरिपाच्या सुरवातीलाच पावसाच्या ओढीने पेरण्या खोळंबल्या होत्या. काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडत होता. मात्र दमदार पावसासाठी अनेक ठिकाणी आॅगस्ट उजाडावा लागला. आॅगस्ट महिन्यात देशभरात चांगला पाऊस झाल्याने पेरण्यांनी वेग घेतला. पावसाने नदी, नाले भरून वाहिले. त्यानंतर पेरण्यांनी वेग घेतला. आतापर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत ०.७ टक्के अधिक, १० कोटी ५३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.

यंदा भात लागवड मागील वर्षीच्या तुलनेत २.३ टक्क्यांनी वाढून ३८०.३३ लाख हेक्टरवर झाली आहे. तेलबिया पेरणीखालील क्षेत्रात ३ टक्क्यांनी वाढ होऊन १७७.३ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. यंदा पंजाबमध्ये पाणी उपलब्ध असल्याने आणि दराची हमी असल्याने कापूस उत्पादक भाताकडे वळले आहेत. तसेच पंजाबमधील भात मिर्ल्सनी शेतकऱ्यांना विषमुक्त भात उत्पादन घेतल्यास हमीभावावर प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपये अधीक दर देण्याचे आश्वासन दिले आहे. 

जलसाठा ७५ टक्क्यांवर
धरणांमध्ये पाणीसाठा वाढला. त्याचा परिणाम पेरणी जास्त होण्यावर झाला. सध्या देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये १२१.६५५ अब्ज घन मीटर पाणीसाठा आहे. एकूण क्षमतेच्या ७५ टक्के पाणी या जलाशयांमध्ये आहे. हा पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत ३१ टक्के जास्त आहे. मागील वर्षी याच काळात ४४ टक्के पाणीसाठा होता. तसेच मगील दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा १०.९ टक्के अधिक पाणीसाठा आहे.   

सोयाबीनची पेरणी वाढली
देशात मागील वर्षी कडधान्य दराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे यंदा अनेक भागातील कडधान्य उत्पादक तेलबिया उत्पादनाकडे वळले आहेत. यंदा कडधान्य पेरणीखालील क्षेत्र १३७ लाख हेक्टरने कमी झाले आहे. शेतकऱ्यांचा जास्त ओढा सोयाबीन पेरणीकडे राहिला आहे. देशात आतापर्यंत सोयाबीनची ११२.५० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी १०५.७६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीन पेरणीत यंदा ६.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

देशातील पीकनिहाय पेरणी (लाख हेक्टरमध्ये)

पीक  २०१८-१९ २०१७-१८
भात    ३८३.३४     ३७४.८१
कडधान्य   १३७.४० १३८.५९
भरडधान्य   १७५.४६ १८२.२३
तेलबिया  १७७.२९ १७१.९८
ऊस  ५१.९४  ४९.८६
ताग    ७.०२     ७.०९
कापूस     १२०.५६   १२०.९८

       

      
      
       
      

 
 

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...