नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या खंडामुळे खरीप संकटात

उशिरा पाऊस झाल्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी केली. सोयाबीन, तूर ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र पावसाने दडी मारल्याने वाढ खुंटली आहे. पिकांवर किडींचा प्राद्रुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येईल. - मुरलीधर गोरे, बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी. पिकांच्या वाढीपुरता मुळवणी पाऊस पडत आहे. सर्व तालुक्यांत एकाचवेळी सारखा पाऊस पडत नाही. विहिरींच्या पाणी पातळीत फारशी वाढ नाही. हलक्या जमिनीवरील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. - हरि पगाडे, धनगरवाडी, जि. नांदेड गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस नाही. हळद पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसला आहे. उत्पादनावर विपरित परिणाम होईल. - बाळासाहेब राऊत, तेलगाव, जि. हिंगोली.
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या खंडामुळे खरीप संकटात
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या खंडामुळे खरीप संकटात

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी आदी खरीप पिकांच्या वाढीच्या तसेच परिपक्वतेच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसला आहे. कीड, रोगांचा प्राद्रुर्भाव वाढला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी खरीप हंगामावरील दुष्काळाचे सावट गडद होत आहे.

यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचे आगमन उशिरा झाले. सर्वदूरसारखा पाऊस झाला नाही. अशा गावांमध्ये जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये पेरण्या झाल्या. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अनेक मंडळांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे पिकांची वाढ जोमाने झाली. परंतु विहिरी, कुपनलिकांना मात्र पाणी आले नाही. गेल्या काही दिवसांमध्ये या जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तो पिकांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे. 

अनेक मंडळांमध्ये आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मूग, उडीद ही पिके फुलोरा, शेंगा परिपक्वेतच्या अवस्थेत आहेत. सोयाबीनचे पीक फुलोरा अवस्थेत आहे. कपाशीचे पीक पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत, तर ज्वारी, बाजरीचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मूग, उडीद, सोयाबीन या कमी कालावधीतील पिकांना संवेदनशील अवस्थेत पाण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून किडींसाठी पोषक वातावरण असल्यामुळे मावा, तुडतुडे या रसशोषण करणाऱ्या किडी, कपाशीवर गुलाबी बोंड अळी, सोयाबीनवर पाने खानारी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. 

अपुऱ्या पावसामुळे जमिनीतील ओलावा कमी होत आहे. कडक उन्ह पडत आहे. त्यामुळे हलक्या-बरड जमिनीवरील पिके सुकून जात आहेत. संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. पावसाच्या खंडामुळे परिपक्वतेच्या अवस्थेत पाणी कमी पडल्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com