Agriculture news in marathi, Kharip crisis in Nanded, Parbhani and Hingoli districts due to rainfall | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या खंडामुळे खरीप संकटात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

उशिरा पाऊस झाल्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी केली. सोयाबीन, तूर ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र पावसाने दडी मारल्याने वाढ खुंटली आहे. पिकांवर किडींचा प्राद्रुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येईल.  

- मुरलीधर गोरे, बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी.

पिकांच्या वाढीपुरता मुळवणी पाऊस पडत आहे. सर्व तालुक्यांत एकाचवेळी सारखा पाऊस पडत नाही. विहिरींच्या पाणी पातळीत फारशी वाढ नाही. हलक्या जमिनीवरील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. 
- हरि पगाडे, धनगरवाडी, जि. नांदेड 

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस नाही. हळद पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसला आहे. उत्पादनावर विपरित परिणाम होईल. 
- बाळासाहेब राऊत, तेलगाव, जि. हिंगोली.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी आदी खरीप पिकांच्या वाढीच्या तसेच परिपक्वतेच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसला आहे. कीड, रोगांचा प्राद्रुर्भाव वाढला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी खरीप हंगामावरील दुष्काळाचे सावट गडद होत आहे.

यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचे आगमन उशिरा झाले. सर्वदूरसारखा पाऊस झाला नाही. अशा गावांमध्ये जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये पेरण्या झाल्या. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अनेक मंडळांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे पिकांची वाढ जोमाने झाली. परंतु विहिरी, कुपनलिकांना मात्र पाणी आले नाही. गेल्या काही दिवसांमध्ये या जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तो पिकांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे. 

अनेक मंडळांमध्ये आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मूग, उडीद ही पिके फुलोरा, शेंगा परिपक्वेतच्या अवस्थेत आहेत. सोयाबीनचे पीक फुलोरा अवस्थेत आहे. कपाशीचे पीक पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत, तर ज्वारी, बाजरीचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मूग, उडीद, सोयाबीन या कमी कालावधीतील पिकांना संवेदनशील अवस्थेत पाण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून किडींसाठी पोषक वातावरण असल्यामुळे मावा, तुडतुडे या रसशोषण करणाऱ्या किडी, कपाशीवर गुलाबी बोंड अळी, सोयाबीनवर पाने खानारी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. 

अपुऱ्या पावसामुळे जमिनीतील ओलावा कमी होत आहे. कडक उन्ह पडत आहे. त्यामुळे हलक्या-बरड जमिनीवरील पिके सुकून जात आहेत. संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. पावसाच्या खंडामुळे परिपक्वतेच्या अवस्थेत पाणी कमी पडल्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.


इतर बातम्या
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून...अकोला  : सोयाबीन पिकाखालील पेरणी...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी...नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...