agriculture news in Marathi, Kharip crop and vegetables and horticulture crop damage by rain, Maharashtra | Agrowon

पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह फळबागांचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

वादळी पाऊस, गारपिटीमुळे आमच्या भागात मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मिरची, टोमॅटोचे अधिक नुकसान झाले. अधिकारी पाहणी करून गेले. शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याची गरज आहे.
- पांडुरंग शेळके, सव, ता. जि. बुलडाणा

पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांसह भाजीपाला आणि फळबागांना मोठा तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणासह वऱ्हाडात नुकसानीचे प्रमाण आधिक असून, अद्यापही पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, माथेरान, सुधागड. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, सिंधुदुर्गमधील दोडमार्ग, कुडाळ, वैभववाडी. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरुड जिल्ह्यात भातपिकांसह भाजीपाला आणि वेलवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले.  

कापूस, सोयाबीन, मका ही प्रमुख पिके असलेल्या मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याच्या कर्जत, संगमनेर, श्रीरामपूर, कोल्हापुरातील चंदगड, गगणबावडा, कागल, पन्हाळा, शिरोळ, नाशिक जिल्ह्यातील हर्सुल, नाशिक, ओझरखेडा, येवला, पुणे जिल्ह्यातील बारामती, जुन्नर, आंबेगाव, खेड, लोणावळा, पुणे शहर, सांगलीतील आटपाडी, जत, कवठे महांकाळ, मिरज, सांगली, तासगाव, विटा, साताऱ्यातील दहीवडी, खटाव, कोरेगाव, सातारा, सोलापूरमधील अक्कलकोट, करमाळा, मंगळवेढा, माहोळ, पंढरपूर, सांगोला, सोलापूरमध्ये वादळी पावसाने दणका दिला आहे. 

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. जिल्ह्यातील देगलूर, कंधार, मुदखेड, मुखेड, नायगाव, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, पाटोदा, जालनातील बदनापूर, जालना, लातूरमधील औसा, जळकोट, लातूर, निलंगा, उस्मानाबादमधील भूम, कळंब, परांडा, उमरगा, वाशी, परभणीतील मानवत, पाथरी, पूर्णा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.

नुकसानग्रस्त पिके
खरीप पिके 

सोयाबीन, कपाशी, भात, मका, तूर, मूग, उडीद, बाजरी, फुले आदी. 

भाजीपाला पिके 
मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, भेंडी, ढोबळी, टोमॅटो, कांदा आदी. 

प्रामुख्याने नुकसानग्रस्त जिल्हे
मध्य महाराष्ट्र :
धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर,
मराठवाडा:  नांदेड, उस्मानाबाद
कोकण: रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया
माझे साडेचार एकर जमिनीत सोयाबीनचे पीक होतो. काढणीसाठी मजुरांची शोधाशोध करत असताना गुरुवारी (ता. १०) रात्री तब्बल दोन तास मुसळधार पाऊस पडला. त्यात काढणीला आलेल्या सोयाबीनच्या रानात गुडघ्याएवढे पाणी साचून मोठे नुकसान झाले. परिणामी आता माझा पेरणीचा व मशागतीचा खर्च निघणेसुद्धा अवघड झाले आहे. गतवर्षीही मोठे नुकसान झाले होते. पीकविमा मिळाला नाही. या वर्षी पुन्हा हे संकट दत्त म्हणून माझ्यासमोर उभे आहे.
- श्रीपत पाटील शिंदे, मांजरम, ता. नायगाव, जि. नांदेड

सतत पडणारा पाऊस आणि वादळी वारे यामुळे परिपक्व झालेल्या भातशेतीचे नुकसान होत आहे. भातशेती जमिनीला टेकली असून, लोंबी गळायला लागली आहे.
- अनंत परब, शेतकरी, खांबाळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
किटकनाशकांचा अतिवापर टाळावा ः घाडगेपुणे : ‘‘खरीप हंगामात पिकांवर रोग किडीवर मोठ्या...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...