agriculture news in marathi, kharip crop loan distribution on 35 percent in Marathwada, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टाच्या ३५ टक्‍क्‍यांवरच अडकून पडले आहे. सर्वाधिक पीक कर्ज वाटपाची जबाबदारी असलेल्या व्यापारी बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या केवळ २५ टक्‍केच कर्जवाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ३५ टक्‍के तर ग्रामीण बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत ७९ टक्‍के कर्जवाटप केले आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टाच्या ३५ टक्‍क्‍यांवरच अडकून पडले आहे. सर्वाधिक पीक कर्ज वाटपाची जबाबदारी असलेल्या व्यापारी बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या केवळ २५ टक्‍केच कर्जवाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ३५ टक्‍के तर ग्रामीण बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत ७९ टक्‍के कर्जवाटप केले आहे. 

खरीप पीक कर्जवाटपासंबंधीची बॅंकांची अनास्था कर्जवाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवरून प्रकर्षाने समोर आली आहे. शिवाय शासनाकडून खरीप पीक कर्जवाटपासंधी केलेले वक्‍तव्यही हवेतच विरल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातील व्यापारी बॅंकांच्या शाखांना यंदा मराठवाड्यात सर्वाधिक ८००४ कोटी ७० लाख ४१ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु, व्यापारी बॅंकांनी १८ सप्टेबरपर्यंत केवळ २५ टक्‍के कर्जवाटप करताना केवळ २००६ कोटी ३ लाख २५ हजार रुपयांचेच कर्जवाटप केले. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी २३४६ कोटी २० लाख रुपये कर्जवाटपाच्या तुलनेत ११९६ कोटी १८ लाख रुपयांचे कर्जवाटप करत ५० टक्‍केच उद्दीष्टपूर्ती केली. ग्रामीण बॅंकेला १५७६ कोटी ९४ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दीष्ट मिळाले होते. त्या तुलनेत ६२ टक्‍के कर्जवाटप करताना ९८३ कोटी ४३ लाख ८२ हजार रुपयांचे कर्जवाटप केले. मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हिंगोली व बीड जिल्ह्यात सर्वात कमी अनुक्रमे २० व २१ टक्‍के जालना जिल्ह्यात सर्वाधिक ५९ टक्‍के कर्जवाटप करण्यात आले. 

 औरंगाबाद जिल्ह्यात ४६ टक्‍के, परभणी २६ टक्‍के, लातूर ४८ टक्‍के, उस्मानाबाद ३२ टक्‍के, नांदेड जिल्ह्यात २९ टक्‍के कर्जवाटपाची उद्दीष्टपूर्ती झाली आहे.

सव्वासात लाख सभासदांनाच कर्ज
मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, व्यापारी बॅंक व ग्रामीण बॅंकेकडून १८ सप्टेबरपर्यंत केवळ सव्वासात लाख शेतकऱ्यांनाच खरीपाचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. कर्जवाटप झालेल्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३ लाख ८१ हजार ७७८, व्यापारी बॅंकांच्या २ लाख १० हजार ४८७ तर ग्रामीण बॅंकेच्या १ लाख ३३ हजार २६४ सभासदांचा समावेश आहे. 

जिल्हानिहाय वाटप झालेले खरीप कर्ज सभासद संख्या (कोटींत)

जिल्हा     सभासद वाटप
औरंगाबाद  ७३११२ ५४३.४२
जालना   ११३९४५   ७५०.४८
परभणी ७२२७६  ३८४.४१
हिंगोली   ४३९३९ १९४.४४
लातूर   १८७२०२ ९१०.७७ 
उस्मानाबाद   ८४४६१   ४४४.६०
बीड  ७०७६०  ४६७.७४
नांदेड   ७९८३४  ४८९.७६

    
      
  
             
     
   
     
    
 

इतर अॅग्रो विशेष
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...
इथेनॉल उत्पादन घटणारपुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...
अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...
पीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...
किमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...
राज्यातील सव्वानऊ हजार गावांत पाणीपातळी...पुणे ः चालू वर्षी राज्यातील अनेक भागांत जोरदार...
शेतीतूनच जाते आर्थिक विकासवाट भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट दिवसेंदिवस...
मदत हवी दिलासादायकअवकाळी पावसाने राज्यात शेतीच्या झालेल्या...
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...