नगर जिल्ह्यात खरीप पेरणीला वेग येईना

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेला असला, तरी अजूनही जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम खरिपातील पेरण्यावर झाला आहे. जिल्हाभरात आतापर्यंत २५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख २४ हजार ४९६ हेक्‍टर आहे. त्यापैकी १लाख ०४ हजार २८७ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पावसाला उशीर होत असल्याने मूग, उडीदाचे क्षेत्र घटले आहे, असे कृषी विभागाने सांगितले.

नगर जिल्ह्यातील बऱ्याच भागात अजूनही भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या, कापूस लागवडीला वेग आलेला नाही. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ४,२४,४९६ हेक्‍टर आहे. मात्र पाऊस नसल्याने आतापर्यंत एक लाख पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. कापसाची साधारण एक लाख ३० हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड होत असते. यंदा मात्र आतापर्यंत केवळ २१ हजार ७०० हेक्‍टरवर लागवड झाली आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाला की बाजरी, सोयाबीन, मुगाची चांगली पेरणी होत असते. मुगाचे सरासरी क्षेत्र १९,३४७  असले तरी दोन वर्षांपूर्वी ४० हजार हेक्‍टरवर, तर उडदाचे १०,५४६ हेक्‍टर सरासरी क्षेत्र असले, तरी ३५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा मात्र पावसाला उशीर होत असल्याने बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन क्षेत्र कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजून १५ दिवसांत चांगला पाऊस आला नाही, तर कापसाच्या क्षेत्रावरही बऱ्यापैकी परिणाम होण्याचा अंदाज आहे. मात्र दोन दिवसांत काही भागांत पाऊस झाला असल्याने आणि चांगला पाऊस येईल, असा अंदाज बांधून पेरणी, कापूस लागवड होत आहे.

पीकनिहाय पेरणी क्षेत्र, कंसात सरासरी क्षेत्र (हेक्‍टर) : भात ः २५४ (१०,६०९), बाजरी ः १९,८९० (१,६०,१८७), मका ः ८४२४ (४२,६६४), तूर ः ७८८१ (७७८४), मूग ः ११,७६० (१९,३४७), उडीद ः १५,३३६ (१०,५४६), भुईमूग ः २४६ (५०४६), तीळ ः ०.४ (१४९), कारळे ः ०.२ (११९६), सूर्यफूल ः ०.८ (८६८), सोयाबीन ः १८,२२४ (५४७५३), कापूस ः २१,७५५ (१,०१,९१८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com