agriculture news in marathi, kharip crop sowing status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात खरिपाची १०९ टक्के क्षेत्रावर पेरणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नगर :  जिल्ह्यातील काही भागांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही; मात्र मध्यंतरीच्या काळात झालेल्या पावसावरच खरिपाची पेरणी झाली. आतापर्यंत खरिपाची ५ लाख २१ हजार ३७५ हेक्टरवर म्हणजेच १०९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.  
 

नगर :  जिल्ह्यातील काही भागांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही; मात्र मध्यंतरीच्या काळात झालेल्या पावसावरच खरिपाची पेरणी झाली. आतापर्यंत खरिपाची ५ लाख २१ हजार ३७५ हेक्टरवर म्हणजेच १०९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.  
 

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र चार लाख ७८ हजार ६३८ हेक्‍टर आहे. सुरवातीच्या काळात पाऊस नसल्याने पेरणीला वेग येत नव्हता. मात्र, मध्यंतरी झालेल्या अल्प पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. त्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या बाजरीची ७५ टक्के म्हणजे १ लाख ४१ हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मकाच्या पेरणीत वाढ झालेली असून  ५३ हजार १४१ हेक्‍टर सरासरी क्षेत्र असलेल्या मक्याची ६६ हजार १८० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ५८ हजार २८२ हेक्टर असून आतापर्यंत ७२ हजार २९२ हेक्टरवर म्हणजेच १२४ टक्के पेरणी झाली आहे. तुरीची २५७ टक्के, मुगाची ३३८ टक्के, उडीदाची ३९५ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या चार वर्षांनंतर पहिल्यांदाच तूर, मूग, उडदाचे क्षेत्र वाढले आहे. कापसाचे सरासरी क्षेत्र एक लाख पाच हजार ४२७ हेक्‍टर असले तरी यंदा लागवड क्षेत्रात वाढ झाली असून आतापर्यंत ११४ टक्के म्हणजे १ लाख २० हजार ६४७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. 

तालुकानिहाय पेरणी (टक्के) ः नगर ः ६१.१८, पारनेर ः २२३.८६, श्रींगोंदा ः ५४१.४६, कर्जत ः ३२२.५२, जामखेड ः १५५.३१, शेवगाव ः १२१.२, पाथर्डी ः ८४.५.६, नेवासा ः ९३.१७, राहुरी ः ७९.३४, संगमनेर ः ७८.१८, अकोले ः ५२.३०, कोपरगाव ः १०९.४१, श्रीरामपुर ः ५१.६०, राहाता ः ११०.८६. 

इतर ताज्या घडामोडी
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...