तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार हेक्टरवर पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदा १४ लाख ८१ हजार १२८ हेक्टर (८६.५६ टक्के) क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. या तीन जिल्ह्यांत सोयाबीनचा पेरा वाढला असून एकूण ७ लाख २२ हजार ६४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ४ लाख ४३ हजार ५० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली असून १ लाख ३६ हजार ५४९ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात एकूण ७ लाख २० हजार ६५८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वच तालुक्यांत सोयाबीनचा पेरा वाढला असून एकूण ३ लाख ३ हजार ४४६ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. कपाशीच्या क्षेत्रात घट झाली असून एकूण २ लाख ६४ हजार ६२० हेक्टरवर लागवड झाली आहे. तुरीची ५९ हजार ६६७, मुगाची २५ हजार ९३१, उडदाची २७ हजार ७३७, भाताची ९४५, ज्वारीची ३६ हजार ६०९, बाजरीची २१८, तीळाची ६८८, कारळाची ३८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात ४ लाख ४२ हजार ५७३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची १ लाख ९८ हजार १००, कपाशीची १ लाख ४८ हजार ९७३, तूरीची ३९ हजार ६६७, मुगाची ३४ हजार ४८६, उडदाची ८५५२, ज्वारीची १० हजार ४१४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनची २ लाख २१ हजार, कपाशीची २९ हजार ४५१, तुरीची ३७ हजार ७३२, मूग ६ हजार ३१०, उडिद ४ हजार ४७०, ज्वारीची ५ हजार ५२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तीनही जिल्ह्यांत सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कपाशी, कडधान्य, तृणधान्याचे क्षेत्र कमी झाले आहे.

जिल्हानिहाय पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर)
जिल्हा पेरणी क्षेत्र
नांदेड  ७,२०,६५८
परभणी  ४,४२,५७३
हिंगोली ३,१७,८९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com